WTC Final Playing 11: WTC च्या अंतिम सामन्यात R Ashwin राहणार संघाबाहेर?,स्वतः प्रशिक्षकाने सांगितलं कारण

R Ashwin: प्रशिक्षकाने भारतीय संघाच्या प्लेइंग ११ बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
r ashwin
r ashwin saam tv
Published On

Ind vs Aus WTC Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. येत्या ७ जून ते ११ जून दरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे. दरम्यान भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल याबाबत अनेक दिग्गजांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. दरम्यान आता ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाने भारतीय संघाच्या प्लेइंग ११ बाबत मोठे वक्तव्य केले आहे.

r ashwin
WTC Final 2023 Pitch Report: अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! ओव्हलच्या मैदानावरील रेकॉर्ड पाहता पराभव निश्चित?

आर अश्विन प्लेइंग ११ मधून बाहेर?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे. या समान्यत रविंद्र जडेजाचं खेळणं निश्चित आहे. कारण तो गोलंदाजीसह फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मोलाचं योगदान देतो. तसेच आर अश्विनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संधी मिळणार की नाही, याबाबत कुठलीही अपडेट समोर आली नाही.

प्रशिक्षकाने केले मोठे वक्तव्य...

केंट क्रिकेट लाईव्हवर बोलताना ऑस्टेलियाचे सहायक प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरीने म्हटले की, 'आम्ही देखील या विषयावर चर्चा करतोय. आम्हाला असं वाटतं की, जडेजाला संधी मिळणार. कारण तो उत्तम फलंदाज देखील आहे. चौथा गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून

शार्दूल ठाकूर किंवा आर अश्विन पैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. हे दोघेही उत्तम पर्याय आहेत.'

आर अश्विनबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ७ सामन्यांमध्ये १८ गडी बाद केले आहेत. ओव्हलच्या मैदानावर त्याला केवळ १ सामना खेळण्याचा अनुभव आहे. अश्विनबाबत बोलताना डॅनियल व्हिटोरीने म्हटले की, 'अश्विन एक उत्तम गोलंदाज आहे. त्याला संघात स्थान देणं ही पहिली पसंती असणार आहे. मात्र ओव्हलच्या मैदानावरील स्थिती पाहता, आर अश्विनला संघाबाहेर बसावं लागू शकतं. (Latest sports updates)

r ashwin
Axar Patel On WTC Final : WTC जिंकण्यासाठी टीम इंडिया खास प्लॅनसह उतरणार मैदानात; संघातील प्रमुख खेळाडूने केला गौप्यस्फोट

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com