PSL 2025: हट, एकाच शॉटमध्ये आऊट होतो हा...; बाबर आझमवर चाहती संतापली, व्हिडिओ व्हायरल

PSL 2025 Babar Azam: सोमवारी झालेल्या सामन्यात बाबर इस्लामाबाद युनायटेडचा वेगवान गोलंदाज बेन द्वारशुइसचा पीएसएलमधील पहिला बळी ठरला.
PSL 2025: हट, एकाच शॉटमध्ये आऊट होतो हा...; बाबर आझमवर चाहती संतापली, व्हिडिओ व्हायरल
Published On

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२५ च्या हंगामात बाबर आझम आऊट ऑफ फॉर्म दिसत आहे. अजून एका सामन्यात अपयशी ठरला. त्याच्या अपयशामुळे एक चाहती कमालीची निराश झाली. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

रावळपिंडीमध्ये इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध झालेल्या सामन्यात पेशावर झल्मीच्या कर्णधाराने फक्त १ धावा काढली. आवडता कर्णधार एकाच धावेवर बाद झाल्याने एक चाहती रागात बोलताना दिसली. हा पुन्हा पुन्हा तोच शॉट खेळताना बाद होतो, असं ही चाहती बोलताना दिसत आहे.

ग्लॅडिएटर्सविरुद्धच्या झल्मीच्या पहिल्या सामन्यात उजव्या हाताचा फलंदाज बाबर आझम मोहम्मद अमीरच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. बाबरचा संघ सामन्याच्या सुरुवातीपासून दबावात होता. त्यात बाबर इस्लामाबाद युनायटेडचा वेगवान गोलंदाज बेन द्वारशुइसचा पहिला बळी ठरला. त्यावर एका चाहतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. X वर एका युझरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, बाबरला बाद होताच एक चाहती रडताना दिसली.

त्यावेळी रागात ती पुटपुटते. " अशा प्रकारे बाद होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. हा पुन्हा पुन्हा त्याच शॉटवर बाद होत राहतो. झल्मी संघाला गतविजेत्या संघाकडून १०२ धावांनी पराभव पत्करावा लागला. २४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी दुसऱ्याच षटकात बाबरची विकेट घेतली. ज्यामुळे सुरुवातीलाच त्यांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com