
जयपूर पिंक पँथर्स संघाने बंगळुरू बुल्सवर ३६-२६ असा शानदार विजय मिळविला आणि प्रो कबड्डी लीग मध्ये प्ले ऑफ च्या दिशेने वाटचाल कायम ठेवली. मध्यंतराला त्यांच्याकडे १५-११ अशी आघाडी होती. हीच आघाडी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत जयपूर व बंगळुरू यांच्यातील सामन्यात सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झाली होती. जयपूर संघाने सुरुवातीपासूनच आघाडी घेण्यावर लक्ष केंद्रित केले होते. खोलवर चढाया व अचूक पकडी यावर त्यांनी जास्त भर दिला होता. मध्यंतराला त्यांनी १५-११ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात सुरुवातीलाच बंगळुरू संघाने लागोपाठ चार गुणांची कमाई करीत १५-१५ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला जयपूर संघाने १८-१७ अशी एक गुणाची आघाडी मिळविली होती.
सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला त्यांनी लोण चढवत आपली आघाडी आणखी वाढवली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे २८-११ अशी आघाडी होती. त्यानंतर लगेच त्यांनी लोण चढविला आणि आपली बाजू बळकट केली.
ही स्पर्धा दोन वेळा जिंकणाऱ्या जयपूर संघाकडून आज अर्जुन देशवाल व सोमबीर मेहरा यांनी पल्लेदार चढाया केल्या. अर्जुन याने आपले नाव सार्थक ठरविताना एकाच चढाईत तीन गडी बात करण्याची किमया ही दाखवून दिली.बंगळूर संघाकडून अजिंक्य पवार व परदीप नरवाल यांचा खेळ कौतुकास्पद होता.
गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं, तर हरयाणा स्टीलर्स ७९ पॉईंट्ससह अव्वल स्थानी आहे. या संघाने २१ पैकी १५ सामने जिंकले आहेत. तर दबंग दिल्लीचा संघ ७१ पॉईंट्सह दुसऱ्या स्थानी आहे. यूपीचा संघ ६९ पॉईंट्सह तिसऱ्या स्थानी आहे. पटना पायरेट्सचा संघ ६८ पॉईंट्सह चौथ्या स्थानी आहे. तर जयपूरचा संघ ६४ पॉईंट्सह पाचव्या स्थानी आहे आणि यू मुंबाचा संघ ७१ पॉईंट्सह सहाव्या स्थानी आहे.
तेलुगु टायटन्सचा संघ सातव्या, पुणेरी पलटण आठव्या, तमिळ थलायवाज नवव्या, बंगाल वॉरियर्स दहाव्या, गुजरात ११ व्या आणि बंगळुरु सर्वात शेवटी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.