PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी संकटमोचक ठरतोय.
PBKS vs RCB IPL 2024 royal challengers bengaluru won by 60 runs amd2000
PBKS vs RCB IPL 2024 royal challengers bengaluru won by 60 runs amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी संकटमोचक ठरतोय. पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या निर्णायक सामन्यातही विराटने ९२ धावांची शानदार खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. पहिल्या डावात फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकअखेर ७ गडी बाद २४१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबचा डाव १८१ धावांवर आटोपला आहे. या परभवणासह पंजाब किंग्जचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

पंजाब किंग्जच्या होम ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने ४७ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने २३ चेंडूंचा सामना करत ५५ धावा केल्या. शेवटी कॅमेरून ग्रीनने २७ चेंडूंचा सामना ४६ धावांची खेळी केली. या शानदार खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकअखेर ७ गडी बाद २४१ धावा केल्या.

PBKS vs RCB IPL 2024 royal challengers bengaluru won by 60 runs amd2000
IPL 2024, Points Table: लखनऊच्या पराभवाचा मुंबई इंडियन्सला दणका! बनला स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ

पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४२ धावा करायच्या होत्या. हे आव्हान खूप मोठं होतं. पंजाबकडून धावांचा पाठलाग करताना रिले रूसोने २७ चेंडूंचा सामना करत ६१ धावांची खेळी केली. तर शशांक सिंगने १९ चेंडूत ३७ धावा केल्या. मात्र पंजाबचा संघ विजयापसून ६० धावा दूर राहिला.

PBKS vs RCB IPL 2024 royal challengers bengaluru won by 60 runs amd2000
SRH vs LSG, IPL 2024: लखनऊचे मालक लाईव्ह सामन्यात केएल राहुलवर भडकले; Video तुफान व्हायरल

या पराभवासह पंजाबचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ १० गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चेन्नई आणि दिल्लीविरुद्ध स्पर्धा करताना दिसून येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com