PAK vs SA: हे सुधरणार नाहीत.. थांबलेला बॉल स्वत: बाऊंड्रीपार पोहचवला; शाहीनच्या फिल्डिंगवर नेटकऱ्यांनी घेतली मजा

Shaheen Afridi Fielding : शाहीन आफ्रिदीच्या फिल्डिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दरम्यान व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मजा घ्यायला सुरुवात केली आहे.
PAK vs SA: हे सुधरणार नाहीत.. थांबलेला बॉल स्वत: बाऊंड्रीपार पोहचवला; शाहीनच्या फिल्डिंगवर नेटकऱ्यांनी घेतली मजा
shaheen afriditwitter
Published On

पाकिस्तान संघातील खेळाडू आणि क्षेत्ररक्षण यांचा ३६ चा आकडा आहे. कारण पाकिस्तानच्या खेळाडूंचं गोलंदाजी आणि फलंदाजीमुळे कौतुक होईल, पण क्षेत्ररक्षणामुळे त्यांना नेहमी ट्रोल केलं जातं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यातही पाकिस्तानच्या खेळाडूंचं पोट धरुन हसायला लावणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

PAK vs SA: हे सुधरणार नाहीत.. थांबलेला बॉल स्वत: बाऊंड्रीपार पोहचवला; शाहीनच्या फिल्डिंगवर नेटकऱ्यांनी घेतली मजा
IND vs ENG: भारत- इंग्लंडचे खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण

दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या तिन्ही संघांमध्ये तिरंगी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील अत्यंत महत्वाचा असा सामना बुधवारी पार पडला. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू या सामन्यात पूर्ण जोर लावताना दिसून आले.

तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना फलंदाजाने फिरुन रिव्हर्स शॉट मारला. त्यावेळी चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने जात होता. शाहीन आफ्रिदी आणि संघातील आणखी २ खेळाडू चेंडू थांबवण्यासाठी मागे धावले.

त्यावेळी शाहीन आफ्रिदीकडे चेंडू थांबवण्याची संधी होती. मात्र त्याने उगाच डाईव्ह मारली आणि तोंडावर आपटला. चेंडूला तर स्पर्शही झाला नाही. चेंडू सरळ सीमारेषेपार केला. शाहीनच्या या क्षेत्ररक्षणामुळे त्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

PAK vs SA: हे सुधरणार नाहीत.. थांबलेला बॉल स्वत: बाऊंड्रीपार पोहचवला; शाहीनच्या फिल्डिंगवर नेटकऱ्यांनी घेतली मजा
IND vs ENG: मास्टरमाईंड रोहित शर्मा! Dangerous डकेटला बाद करण्यासाठी असा रचला सापळा -VIDEO

मॅथ्यू ब्रित्जकीसोबत भिडला

शाहीन आफ्रिदी या सामन्यात तुफान चर्चेत राहिला. क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत आल्यानंतर, त्याने मॅथ्यू ब्रित्जकीसोबत वाद केला. तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना मॅथ्यू ब्रित्जकी स्ट्राईकवर होता. त्यावेळी शाहीन आफ्रिदीने टाकलेला चेंडू मॅथ्यू ब्रित्जकीने हलक्या हाताने खेळून काढला.

त्यानंतर त्याने क्षेत्ररक्षकाला बॅट दाखवली. शाहीन आफ्रिदी त्याच्याकडे गेला आणि त्याला शिवीगाळ केला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मॅथ्यू ब्रित्जकीने शॉट खेळून १ धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धावत असताना शाहीनने त्याच्या पायात पाय अडकवून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मॅथ्यू ब्रित्जकी आणि शाहीन आफ्रिदी आमनेसामने आले. खेळाडू आणि अपांयरने मद्यस्थी करत हा वाद मिटवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com