Pakistan : पाकिस्तानची फजिती आणि पंचनामा, पावसामुळं पत घसरली! VIDEO बघून जमिनीवर पडेस्तोवर हसाल!

Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना काल पावसामुळे थांबला. दरम्यान पावसाचे पाणी मैदानाबाहेर काढण्यासाठी विचित्र उपाय केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रचंड ट्रोल होत आहे.
afg vs aus pakistan troll
afg vs aus pakistan trollsaam tv
Published On

Champions Trophy : काल चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा सामना पाकिस्तानच्या लाहौरमध्ये खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत २७३ धावा केल्या. पुढे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले. अचानक पाऊस पडायला सुरुवात झाल्याने सामना मध्येच रद्द झाला. दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला. ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यादरम्यान पाऊस पडायला सुरुवात झाली. पावसाचे पाणी मैदानातून बाहेर काढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जुगाड लावला. त्यांनी मैदानातून पाणी काढण्यासाठी चक्क स्पंजचा वापर केला. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेवरुन पीसीबीला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले.

पाऊस सुरु झाल्यानंतर बोर्डाने मैदानात छोटे कव्हर पीच खराब होऊ नये म्हणून लावले. त्यानंतर पाणी काढण्यासाठी त्यांनी अनेक उपाय करुन पाहिले. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी स्पंज वापरुन पाणी बाहेर काढून मैदान साफ करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी वायपरने पाणी मैदानाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये वायपर वापरणारा कर्मचारी घसरुन पडल्याचेही पाहायला मिळाले.

afg vs aus pakistan troll
Champions Trophy 2025: सेमिफायनलआधीच बलाढ्य ऑस्ट्रेलियाला जोरदार धक्का, घातक खेळाडू दुखापतीमुळं होऊ शकतो OUT

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या सामन्यांमध्ये पावसामुळे व्यत्यय आला. तिन्हीही सामने ज्या-ज्या स्टेडियममध्ये खेळले गेले, तेथे ड्रेनेज स्टेडियम खराब होती हे स्पष्ट झाले. यावरुन चाहत्यांनी रागदेखील व्यक्त केला होता. या एकूण प्रकारावरुन पाकिस्तानने आयसीसीचे पैसे पावसाच्या पाण्यात बुडवले असे लोक म्हणत आहेत.

afg vs aus pakistan troll
Jasprit Bumrah: गुड न्यूज! जसप्रीत बुमराह मैदानात परतला; टीम इंडियात केव्हा परतणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com