Asia Cup 2023: भारत -पाकिस्तान सामन्याच्या तिकीट विक्रीला सुरूवात; मात्र PCB ने ठेवलीये ही अट

Asia Cup Tickets Booking: पीसीबीने या सामन्यांच्या तिकीटांबाबत मोठी घोषणा केली आहे.
rohit sharma with babar azam
rohit sharma with babar azam saam tv
Published On

IND vs PAK Asia Cup 2023 Tickets:

आशिया चषक स्पर्धेचा थरार येत्या ३० ऑगस्टपासून रंगणार आहे. या स्पर्धचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेतील बहुप्रतिक्षीत भारत- पाकिस्तान सामना येत्या २ सप्टेंब रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पीसीबीने या सामन्यांच्या तिकीटांबाबत मोठी घोषणा केली आहे.

rohit sharma with babar azam
IND vs IRE: कर्णधार, उपकर्णधारासह संपूर्ण संघ बदलणार! आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद जरी पाकिस्तानकडे असले तरीदेखील भारतीय संघाचे सर्व सामने हे श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. अशातच श्रीलंकेत होणाऱ्या या सामन्यांची तिकीटं आजपासून म्हणजेच १७ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठीचे तिकीटं pcb.bookme.pk या सांकेतिक स्थळावर जाऊन बुक करता येणार आहेत.

कसं करायचं बुक?

भारत- पाकिस्तान याच्यांतील सामना येत्या २ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या सामन्यासाठीचे तिकीट १७ ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. या विक्रीला दुपारी १२:३० वाजता सुरुवात होणार आहे. तर श्रीलंकेत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील तिकीटांची विक्री संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. भारत - पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेतकलेच्या मैदानावर रंगणार आहे.

ओळख दाखवण्यासाठी लागतील ही कागदपत्र..

पीसीबीने दिलेल्या माहितीनूसार एका पासपोर्टवर जास्तीत जास्त ४ तिकीटं खरेदी करू शकतात. मात्र भारत- पाकिस्तान सामन्यासाठी एका पासपोर्टवर जास्तीत जास्त २ तिकीटं खरेदी करता येणार आहे. ज्या लोकांना हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये सामने पाहायची असतील त्यांना Ticketing@pcb.com.pk या ईमेल आयडीवर मेल करावा लागणार आहे. (Latest sports updates)

rohit sharma with babar azam
World Cup 2023: विराटने 'या' क्रमांकावर फंलदाजीला यावं तर रोहितने ओपनिंग सोडावी! WC साठी शास्त्री गुरूजींनी सांगितला मास्टरप्लान

आगामी आशिया चषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक...

  • पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - ३० ऑगस्ट

  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - ३१ ऑगस्ट

  • भारत विरुद्ध पाकिस्तान - २ सप्टेंबर

  • बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - ३ सप्टेंबर

  • भारत विरुद्ध नेपाळ - ४ सप्टेंबर

  • श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - ५ सप्टेंबर

सुपर-२४ सामने

  • अ १ विरुद्ध ब २ - ६ सप्टेंबर

  • ब १ विरुद्ध ब २ - ९ सप्टेंबर

  • अ १ विरुद्ध अ २ - १० सप्टेंबर

  • अ २ विरुद्ध ब १- १२ सप्टेंबर

  • अ १ विरुद्ध ब १ - १४ सप्टेंबर

  • अ २ विरुद्ध ब २ - १५ सप्टेंबर

  • अंतिम सामना - १७ सप्टेंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com