Shan Masood: पाकिस्तानच्या कर्णधाराची इज्जतच नाही, भर PC मध्ये झाला राडा, शान मसूदला राग अनावर -VIDEO
Shan masoodtwitter

Shan Masood: पाकिस्तानच्या कर्णधाराची इज्जतच नाही, भर PC मध्ये झाला राडा, शान मसूदला राग अनावर -VIDEO

Pakistan vs England Shan Masood Press conference: पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदची एका पत्रकाराने पत्रकार परिषदेत लायकी काढली आहे.
Published on

Shan Masood Press Confernece: पाकिस्तान क्रिकेटमध्ये कधी काय होईल, याचा काही नेम नसतो. अचानक कुठलाही खेळाडू निवृत्ती जाहीर करतो, त्यानंतर अचानक तो निवृत्तीतून बाहेर येत संघात कमबॅक करतो. तर कधी अचानक कर्णधार बदलला जातो. तर कधी बोर्डचा अध्यक्ष बदलला जातो. पाकिस्तानमध्ये कर्णधार आणि अधिकाऱ्यांना हवा तितका सन्मान मिळत नाही, हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान संघाला शान मसूदच्या नेतृत्वाखाली खेळताना बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर जोरदार टिका करण्यात आली होती. आता इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी शान मसूदची पुन्हा एकदा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान कर्णधार म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्याची पत्रकार परिषद पार पडली.

Shan Masood: पाकिस्तानच्या कर्णधाराची इज्जतच नाही, भर PC मध्ये झाला राडा, शान मसूदला राग अनावर -VIDEO
IND vs BAN 2nd Test : रोहित-गंभीरच्या डावपेचामुळे बांगलादेशचा खेळ खल्लास, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने शान मसूदला विचारले की, ' शान तू म्हणाला की, पीसीबी जोपर्यंत संधी देत आहे, तोपर्यंत तू खेळत राहणार. पण तुला असं वाटत नाही का पाकिस्तानचा संघ पराभूत होतोय, त्यामुळे तू कर्णधारपद सोडून द्यायला हवं? शान मसूदकडे या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं. तो फक्त पाकिस्तानच्या मीडिया डायरेक्टरकडे पाहत होता आणि हसत राहिला.

Shan Masood: पाकिस्तानच्या कर्णधाराची इज्जतच नाही, भर PC मध्ये झाला राडा, शान मसूदला राग अनावर -VIDEO
IND vs BAN: दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर टीम इंडियासाठी कसं असेल WTC फायनलचं समीकरण?

मीडिया डायरेक्टर पत्रकारांवर भडकला

ही पत्रकार परिषद संपल्यानंतर पाकिस्तान संघाचा मीडिया डायरेक्टर सामी उल हसन पत्रकारांवर भडकला. तो म्हणाला की, ' एक शेवटची विनंती आहे. पाकिस्तानचा कर्णधार समोर बसला आहे. तुम्ही प्रश्न नका विचारु पण त्याचा आदर तरी करा. तुम्ही पाकिस्तानच्या कर्णधाराला जे विचारलं ते खूप चुकीचं होतं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com