Virat Kohli On Retirement: 'काम संपलं की निघून जायचं अन् मग..' निवृत्तीबाबत विराट कोहलीचं मोठं वक्तव्य

Virat Kohli Statement On Retirement: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Virat Kohli On Retirement: 'काम संपलं की निघून जायचं अन् मग..' निवृत्तीबाबत विराट कोहलीचं मोठं वक्तव्य
Once I am done I will be gone you won't see me for while said virat kohli on his retirement plans amd2000saam tv news

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदाच आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे. त्याने स्पष्ट म्हटलं आहे की, निवृत्त होताना मला असा विचार करायचा नाहीये की एखादी गोष्ट करायची राहून गेली. यासह त्याने फॅन्सला असं देखील म्हटलंय की, निवृत्त झाल्यानंतर तो लवकर दिसणार नाही. येत्या नोव्हेंबर महिन्यात तो ३६ वर्षांचा होणार आहे. त्याचा शानदार फिटनेस पाहता, तो अजून २-३ वर्ष क्रिकेट खेळू शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका पॉडकास्टमध्ये विराट कोहलीला निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला की, ' एक खेळाडू म्हणून आमच्या कारकिर्दीची शेवटी तारीख असते. त्यामुळे माझ्या संघासाठी खेळताना मला दररोज सर्वोत्तम द्यायचं आहे. त्या दिवशी मी असं करायला हवं होतं, असा विचार करून मला माझी कारकीर्द संपवायची नाही. प्रत्येक दिवस सारखा नसतो. ज्यादिवशी माझं काम संपेल, मी निघून जाईल.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' त्यानंतर तुम्ही मला पाहू शकणार नाही. कारकीर्दीत काहीतरी करायचं राहुन गेलं याचा मला पश्चात्ताप करायचा नाही. जोपर्यंत मी खेळत आहे तोपर्यंत मी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. हाच विचार करून मी पुढे जातोय.'

Virat Kohli On Retirement: 'काम संपलं की निघून जायचं अन् मग..' निवृत्तीबाबत विराट कोहलीचं मोठं वक्तव्य
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

विराट कोहलीने वयाची ३५ वर्ष गाठली आहे. मात्र अजूनही तो फिटनेस आणि खेळाच्या बाबतीत युवा खेळाडूंना टक्कर देतोय. आयपीएल २०२४ स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये ६६१ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत जगभरातील अनेक विस्फोटक फलंदाजांनी सहभाग घेतला आहे. मात्र कोणालाच ६०० धावांचा पल्ला देखील गाठता आलेला नाही. तर विराट कोहलीची ७०० धावांच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

Virat Kohli On Retirement: 'काम संपलं की निघून जायचं अन् मग..' निवृत्तीबाबत विराट कोहलीचं मोठं वक्तव्य
IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com