खेळाडूला मानलंच पाहिजे; रेस ट्रॅकवरुन दिला प्रामाणिकपणाचा संदेश

ऑलिम्पिकमध्ये (Olympics) एक फार प्रेरणादायी प्रसंग घडला होता. सध्या सोशियल मीडियावरती एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
खेळाडूला मानलंच पाहिजे; रेस ट्रॅकवरुन दिला प्रामाणिकपणाचा संदेश
खेळाडूला मानलंच पाहिजे; रेस ट्रॅकवरुन दिला प्रामाणिकपणाचा संदेशInstagram
Published On

ऑलिम्पिकमध्ये (Olympics) एक फार प्रेरणादायी प्रसंग घडला होता. सध्या सोशियल मीडियावरती एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. हा प्रसंग ऐकून तुम्ही म्हणाल खेळाडू असावा तर असा. हीच ती खिलाडूवृत्ती. तर झालं असं केनियाचा ऑलिम्पिक धावपटू हबेल मुतई (Abel Kiprop Mutai) शर्यतीमध्ये इतका जोरात धावला की बाकी खेळाडूंच्या तो खूप पुढे निघून गेला. शेवटी तो फिनिश लाईनच्या थोडा मागे येऊन थांबला त्या वाटले आपण शर्यत पुर्ण केली आहे. परंतू शर्यत पुर्ण करण्यासाठी फिनिश लाईन पार करावी हेच हबेलला माहित नसावे.

मागून येणारा स्पानिश धावपटू ईवान फर्नांडीज (Ivan Fernandez) त्याला पाहून चक्रावला. त्याला कळेना हे काय सुरु आहे. एवढा जोरात पुढे पळत आलेला धावपटू फिनिश लाईनच्या पाठिमागे का उभा असावा? हे त्याला कळेना. त्याने ते सर्व बाजूला ठेऊन केनियन धावपटूवर ओरडायला सुरुवात केली. परंतू झालं असं की केनियन धावपटूला स्पानिश भाषा समजत नव्हती त्यामुळे तो काय बोलतोय हे त्याला कळेना म्हणून केनियन धावपटू प्रश्नात पडला. सर्व शर्यत पुर्ण झाली आणि हाबेल विजयी झाला.

खेळाडूला मानलंच पाहिजे; रेस ट्रॅकवरुन दिला प्रामाणिकपणाचा संदेश
Tokyo Olympics 2020 : भारताचे आणखी एक मेडल नक्की! लवलीनाची फायनलमध्ये धडक

पत्रकारांनी ईवान फर्नांडीज ला प्रश्न विचारला तू असे का केले? तर फर्नांडीजने उत्तर दिले ''माझे स्वप्न आहे की एक दिवस आपल्यातील समाज सर्वाांना आणि स्वत:लाही पुढे नेऊन विजयी होईल''. पत्रकारांने पुढचा प्रश्न विचारला तू केनियन धावपटूला का विजयी होऊ दिले त्यावर ईवानने उत्तर दिले मी त्याला जिंकवत नव्हतो तो जिंकणारच होता कारण ही शर्यत त्याची होती.

रिपोर्टरने आग्रह केला आणि पुन्हा विचारले, "पण तू जिंकू शकला असता!" इवानने त्याच्याकडे पाहिले आणि उत्तर दिले: "पण माझ्या विजयाची योग्यता काय असेल? या पदकाचा सन्मान काय असेल? माझ्या आई याबद्दल काय विचार करेल?" आपली मुल्ये ही पिढ्यानपिढ्या पुढे जात राहतात. आम्ही आमच्या मुलांना कोणती मूल्ये शिकवणार आणि आपण इतरांना किती पैसे कमविण्यास प्रेरित करणार? आपल्यातील काही लोक लोकांच्या कमकूवत पणाचा फायदा घेतात नाकी त्यांना मदत करतात.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com