IPL 2022: पराभवानंतर केएल राहुल म्हणाला, 'खोटं बोलत नाही, पण आता आम्ही...'

लखनौच्या संघाने राजस्थानविरुद्ध सामना जिंकला असता तर त्यांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात दबाव नसला असता.
K L Rahul
K L RahulSaam TV

लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यामध्ये काल सामना पार पडला. केएल राहुल (KL Rahul) आणि संजू सॅमसन एकमेकांसमोर होते. राजस्थानच्या संघाने लखनौच्या संघाला हारवून पॉईंट टेबलमध्ये सुधारणा केली आहे. हा सामना जर लखनौच्या संघाने जिंकला असता तर 18 गुणांसह लखनौ पहिल्या दोनमध्ये पोहोचले असते. परंतु फलंदाजांनी केलेल्या निराशजनक कामगिरीमुळे लखनौचा 24 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार केएल राहुलने आपण दबावाखाली आहोत आणि पुढच्या सामन्यासाठी आम्हाला पुन्हा उभे राहायचे आहे असे म्हटले आहे.

आता राजस्थान आणि लखनौ यांपैकी कोण दुसऱ्या क्रमांकावर असेल हे त्यांच्या शेवटचा साखळी सामन्यावर अवलंबून असेल. आयपीएलमध्ये कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही, तर ती गोष्ट कष्टाने मिळवावी लागते असे राहुलने सांगितले आहे. जर लखनौच्या संघाने राजस्थानविरुद्ध सामना जिंकला असता तर त्यांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात दबाव नसला असता.

K L Rahul
IPL 2022: 24 तासातच उतरणार चहलची 'पर्पल कॅप'?; या पंजाबी खेळाडूपासून धोका

“मी खोटं बोलणार नाही, हो, थोडंसं दडपण आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की या स्पर्धेत काहीही सोपे नसते आणि कोणताही मुद्दा सोपा नसतो आणि आम्हाला या कठीण मार्गाने चालणे शिकावे लागणार आहे. आम्ही राजस्थानविरुद्ध सामना जिंकलो असतो तर आम्ही शेवटचा सामन्या क्रिकेटचा आनंद घेतला असता परंतु पराभव झाल्याने आमच्या दबाव असणार आहे असे केएल राहुल सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रत्येक सामन्यात दबाव आणि आव्हाने असतात: केएल राहुल

“पण आम्ही सध्या अशा स्थितीत आहोत जिथे आम्हाला पुढचा सामना जिंकायचाच आहे. मला वाटते की हे चांगले आहे, आम्हा सर्वांना माहित आहे की प्रत्येक खेळ महत्त्वाचा आहे, प्रत्येक गेममध्ये दबाव आणि आव्हाने येतात. एक संघ म्हणून स्वतःला आव्हान देणे आणि तो सामना जिंकण्याचा प्रयत्न करणे, ती गती पुढे नेणे आणि थोडा आत्मविश्वास वाढवणे महत्त्वाचे असते असे राहुल पुढे म्हणाला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com