IPL 2022: 24 तासातच उतरणार चहलची 'पर्पल कॅप'?; या पंजाबी खेळाडूपासून धोका

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) 24 विकेटसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal Saam TV
Published On

आयपीएलचा (IPL 2022) यंदाचा हंगामात चांगलाच रंगात आला. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघांमध्ये शर्यत सुरु आहे. तर खेळाडूंमध्ये पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपसाठी (Orange Cap) शर्यत सुरु आहे. सध्या आयपीएलमध्ये सर्वात मोठी शर्यत आहे ती सर्वाधिक विकेट कोण घेणार?. सध्या पर्पल कॅप राजस्थान रॉयलचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या डोक्यावर आहे. परंतु चहलचा पर्पल कॅपवरती कब्जा किती दिवस राहणार हा प्रश्न आहे. कारण चहलच्या पर्पल कॅपला (Purple Cap) पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडापासून धोका आहे. आज पंजाबचा सामना दिल्लीसोबत आहे आणि चहल आणि रबाडामध्ये विकेटचे अंतर फार काही जास्त नाहीये.

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) 24 विकेटसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. 13 सामन्यात 16.83 च्या सरासरीने आणि 7.76 च्या इकॉनमीने त्याने या विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वानिंदु हसरंगा, ज्याने 13 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत. हसरंगाचा इकॉनमी 7.48 आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कगिसो रबाडा आहे ज्याचा 11 सामन्यात 21 विकेट आहे, रबाडाचा इकॉनमी 8 पेक्षा जास्त आहेत.

Yuzvendra Chahal
गुजरात विरोधात चेन्नईचा दारुण पराभव, कर्णधार धोनी म्हणाला... 'तो' निर्णय चुकीचा होता

चहलची 'पर्पल कॅप' 24 तासांतच उतरणार?

चहलपासून रबाडा फक्त 3 विकेट्स दूर आहे. म्हणजेच जर रबाडाने तीन विकेट घेतल्या तर पर्पल कॅप रबाडाच्या डोक्यावर जाऊ शकते. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पंजाब किंग्जचा सामनाही महत्त्वाचा आहे. या महत्त्वाच्या सामन्यात पंजाब फ्रँचायझी रबाडाकडून एका चांगल्या खेळाची आकांक्षा बाळगेल. त्याने आज तीन विकेट घेतल्या तर चहलच्या डोक्यावरची पर्पल कॅप 24 तासात खाली उतरु शकते.

सर्वाधिक सामने, सर्वाधिक विकेट

सध्या पर्पल कॅपची शर्यत काट्याची झाली आहे. त्यात कोण जिंकणार, कोण सर्वाधिक सामने खेळणार हेही महत्त्वाचे आहे. ज्या संघांचे गोलंदाज सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत पुढे आहेत, त्यांच्या संघांनाही प्लेऑफमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. कारण त्यांना एकाच ट्रॅकवर अधिक सामने मिळू शकतात. पण, चहल, रबाडा किंवा हसरंगाच्या संघाचे प्लेऑफसाठी तिकीट निश्चित झालेले नाही. अशा स्थितीत स्पर्धा संपल्यावर पर्पल कॅपचा प्रमुख कोण असेल, हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. सध्या चहल आघाडीवर आहे पण त्याच्या आघाडीचे विजयात रुपांतर होण्याची वाट पाहावी लागेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com