दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आजपासून सुरुवात झाली आहे. इंडिया ए चा सामना इंडिया डी संघाविरुद्ध सुरु आहे. तर इंडिया सी चा सामना इंडिया बी विरुद्ध सुरु आहे. मात्र हा सामना सुरु होताच फॅन्स नाराजी व्यक्त करताना दिसून आले आहेत.
दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील सामने जिओ सिनेमा अॅपवर लाईव्ह प्रक्षेपित केले जात आहेत. आजपासून सुरु झालेला इंडिया ए विरुद्ध इंडिया डी यांच्यातील सामना हा जिओ सिनेमावर प्रक्षेपित केला जात आहे.
हा सामना रुरल डेव्हलपमेंट स्टेडियम अनंतपूरममध्ये सुरु आहे. तर दुसरा सामना इंडिया डी आणि इंडीया बी या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना कुठेच प्रक्षेपित केला जात नाहीये. त्यामुळे फॅन्स सोशल मीडियावर संपत्त प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
या सामन्यात ऋतुराज गायकवाड फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. तो सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर दुखापतग्रस्त झाला, पण त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, हे कोणालाच कळालं नाही. कारण हा सामना कुठेच प्रक्षेपित केला जात नाहीये.
दरम्यान एका युझरने पोस्ट शेअर करत लिहिले की, 'इंडिया सी संघाच्या सामन्यांचं कुठेच प्रक्षेपण केलं जात नाहीये. ऋतुराज गायकवाडसोबत काय झालं? हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे.' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'सामने प्रक्षेपित करणं हे खूप गरजेचं आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सामन्यांकडे दुर्लक्ष करु नका. ऋतुराज गायकवाडची दुखापत ही तुमच्यासाठी रिमाइंडर आहे. '
इंडिया सी विरुद्ध इंडिया बी यांच्यातील सामन्यात इंडिया बी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंडिया सी संघातील फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर तो दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन त्याला मैदान सोडावं लागलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.