नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपचा (T20 World Cup) थरार सुरु असून आज न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड सामना झाला. न्यूझीलंडने त्यांच्या सुपर12 मधील ग्रुप-1 च्या शेवटच्या सामन्यात आयर्लंड 35 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. आयर्लंड पराभव करून न्यूझीलंड सात गुणांवर पोहोचली आहे. तसंच त्यांच्या ग्रुपमध्येही न्यूझीलंडने अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांचा नेट रनरेटही जबरदस्त आहे.
त्यामुळे न्यूझीलंड संघाची सेमिफायनलची (world cup semi final) जागा जवळ जवळ पक्की झाली आहे. आता त्यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध टक्कर द्यावी लागू शकते. जर या दोन्ही संघांनी चमत्कर करून अतिशय चांगल्या रनरेटनं सामने जिंकले, तरच न्यूझीलंडला बाहेर करू शकतात. पण असं होण्याची शक्यता खूपच कमी आहे. (New Zealand won against ireland)
न्यूझीलंडने दिलं होतं 186 धावांचं टार्गेट
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक हारल्याने प्रथम फलंदाजी केली. याचदरम्यान सलामीवीर फलंदाज फिन एलेन (32) आणि डेवॉन कॉन्वेनं चांगली सुरवात केली. त्यानंतर कर्णधार केन विलियमसनने तीन नंबरवर फलंदाजी करून 35 चेंडूत 61 धावा कुटल्या. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये डेरेल मिचेलनं 21 चेंडूत 31 धावा केल्या.
अशाप्रकारे न्यूझीलंड टीमने 6 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने चमकदार कामगिरी केली. त्याने या वर्ल्डकपची दुसरी हॅट्रिक घेतली. जोशुआने केन विलियमसन,जिमी नीशम आणि मिचेल सॅंटनरला बाद केलं. जोशुआनं चार षटकांमध्ये 22 धावा देऊन 3 विकेटस् घेतल्या.
35 धावांनी आर्यलॅंडचा पराभव
न्यूझीलंडने दिलेल्या 186 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंड टीमनं दमदार सुरुवात केली होती. पॉल स्टर्लिंगने 27 चेंडूत 37 धावा केल्या. तर कर्णधार एंड्रयू बालबिरनीनं 25 चेंडूत 30 धावा केल्या. मात्र, उर्वरीत फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्यानं संघाला पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे आयर्लंड टीमनं 9 विकेट्स गमावत 150 धावाच केल्या. लॉकी फर्ग्यूसनने सर्वात जास्त तीन विकेट घेतल्या.
या विजयानंतरही न्यूझीलंड सेमिफायनलमधून बाहेर होणार?
आर्यलॅंड विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतरही न्यूझीलंडचा संघ सेमिफायनल मधून बाहेर होऊ शकतो. त्यासाठी ऑस्ट्रेलियाला आगामी होणाऱ्या शेवटच्या सामन्यात जवळपास 185 धावांच्या फरकानं विजय संपादीत करावा लागेल. तसंच इंग्लंडलाही त्यांच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला जवळपास 128 धावांनी पराभूत करावं लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.