टोकियो : ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांनी पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अवनी लेखाराचे avani lekhara अभिनंदन केले. याबराेबरच तिच्यासह अन्य खेळाडूंचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अवनी लेखाराने महिला आर- २ १० मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात असका शूटिंग रेंजमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. १९ वर्षीय अवनी पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला ठरली आहे. तिच्यानंतर आज या स्पर्धेत एकेक भारतीय खेळाडूंनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उज्जवल कामगिरी करीत पदकांची लयलूट केली.
अवनी आणि अन्य खेळाडूंवर भारतीय क्रीडाप्रेमींसह नागरिक समाज माध्यमातून त्यांच्यावर काैतुकाचा वर्षाव करीत आहेत. पहिल्या पॅरालिंपिक स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरीबद्दल आणि आम्हांला पुन्हा टोकियोत राष्ट्रगीत ऐकण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन असे ट्विट नीरज चोप्राने केले आहे. याबराेबरच नीरजने देवेंद्र झाझरिया Devendra Jhajharia यांचे अभिनंदन करताना देवेंद्रभाई साहब तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात. आज पर्यंतच्या आपल्या पॅरालिंपिक स्पर्धेतील तिस-या पदकाबद्दल अभिनंदन असे म्हटलं आहे.
नीरजने सुंदर भाऊ तुम्ही केलेली कामगिरी अलाैकिक असून तुमचे ही अभिनंदन असे सुंगरसिंग गुर्जार Sundar Sungh Gurjar यांचे काैतुक केले आहे.
ऑलिंपिकपटू वेटलिफ्टर सायखोम मीराबाई चानू यांनी अवनीचे काैतुक करताना तिने अंतिम फेरीची सुरुवात अतिशय वेगवान केली. तिने सात गुणांपेक्षा अधिक गुण मिळवले. पहिल्या टप्प्यात तिचे फक्त दोन शॉट दहाच्या खाली गेले ज्यामुळे ती दुसऱ्या स्थानावर फेकली गेली. अंतिम टप्प्यात जाताना अवनीने पहिला क्रमांक मिळवला आणि प्रतिस्पर्धी विरुद्ध निर्णायक आघाडी मिळवित राखली. तिचे खूप खूप अभिनंदन.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.