सागर आव्हाड पुणे, ता. ३० जून २०२४
टी ट्वेंटी विश्वचषकातील १७ वर्षांचा वनवास संपवत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली. काल बार्बाडोसच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरले. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या विजयानंतर ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या २ खेळाडूंचे विशेष कौतुक केले.
काय म्हणाले शरद पवार?
भारतीय संघातील सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका त्यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केलं. टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. कालच्या सामन्यात भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला, असे शरद पवार म्हणाले.
"सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसपित बुमरा आणि सुर्यकुमार यादव चांगली कामगिरी केली. T20 च्या विजेतेपदाच्या दुष्काळातून भारताची मुक्तता केली. द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले. विशेषतः सुर्यकुमार यादवने सुंदर कॅच घेतला, असंही शरद पवार पुढे म्हणाले.
विराट कोहली आणि रोहित शर्मा दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत फॉर्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असतं. दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे. नव्याना संधी मिळण्याच्या दृष्टीने माझ्या मते हा निर्णय योग्य आहे. सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित केले. या दोघांचा निर्णय बरोबर आहे मी त्यांचं अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.