
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामन्यांची मालिका सुरु असताना, रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. मुख्य बाब म्हणजे भारताचा कर्णधार रोहित शर्मा रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने मुंबई संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित तब्बल १० वर्षांनंतर रणजी ट्रॉफी खेळायला मैदानात उतरला आहे.
रोहितला तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडताना पाहिलं असेल. पण गेली १० वर्ष तो देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसून आला नव्हता. आता बीसीसीआयने नवा नियम लागू केल्यानंतर सर्व खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळणं बंधनकारक असणार आहे.
त्यामुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेआधी रोहितने रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये तो शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी मुंबई आणि उत्तरप्रदेश सामना पार पडला होता. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात रोहितने ११३ धावांची शानदार खेळी केली होती. रोहितला या सामन्यातील पहिल्या डावात अवघ्या ३ धावा करता आल्या.
हा सामना रोहित शर्मासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत रोहितची बॅट शांतच राहिली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत बुमराहने रोहित शर्मापेक्षा अधिक धावा केल्या होत्या. इथून पुढे रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरायचं आहे. त्यामुळे रोहितने फॉर्ममध्ये येणं खूप गरजेचं आहे.
या सामन्यासाठी अशी आहे मुंबईची प्लेइंग ११:
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शिवम दुबे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, मोहित आवस्थी, कार्श कोठारी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.