Deep Fake Video : सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ कुठून अपलोड झाला? IP अ‍ॅड्रेसवरून ठिकाण कळलं!

Sachin Tendulkar Deep Fake Video : सचिन तेंडुलकरचा डीप फेक व्हिडीओ फिलिपिन्समधून अपलोड करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
Sachin Tendulkar News
Sachin Tendulkar NewsSaam tv
Published On

सचिन गाड

Sachin Tendulkar Deep Fake Video :

सचिन तेंडुलकरच्या डीप फेक व्हिडीओ प्रकरणी मोठा अपडेट समोर आली आहे. सचिन तेंडुलकरचा हा डीप फेक व्हिडीओ फिलिपिन्समधून अपलोड झाला असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी व्हिडीओ ज्या आयपी अॅड्रेसवरुन अपलोड झाला त्याचा शोध घेतला आहे. (Latest Marathi News)

सचिन तेंडुलकरच्या जुन्या व्हिडीओत फेरफार करून तो ऑनलाइन गेमची जाहिरात करत असल्याचे दाखवण्यात आले होते. सचिन तेंडुलकरचा डीप फेक व्हिडीओ फिलिपिन्समधून अपलोड करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. तेंडुलकरचे स्वीय सहाय्यक रमेश पारधे यांनी या घटनेची पश्चिम विभागीय सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sachin Tendulkar News
Katrina Kaif Deepfake: कतरिना कैफ पुन्हा डीपफेकची शिकार, हृतिक रोशनसोबतचा व्हिडीओ व्हायरल

पोलिसांनी पारधे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला होता. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी हॉटमेल खात्याचा वापर करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी ई-मेल कंपनीशी संपर्क साधला असून त्यांच्याकडे अधिक माहिती मागितली आहे. आरोपींनी त्यांची ओळख लपवण्यासाठी VPN चा वापर केला होता की नाही, हे देखील पोलीस तपासत होते.

Sachin Tendulkar News
PM Modi On DeepFake: गरबा खेळतानाचा स्वत:चाच व्हिडीओ पाहून PM मोदी झाले चकीत, Deep Fake बाबत व्यक्त केली चिंता

व्हिडिओ समोर आल्यानंतर स्वत: सचिन तेंडुलकरने आपल्या अधिकृत X अकाऊंटवर पोस्ट शेअर करून सर्वांना सतर्क केले होते. हा व्हिडिओ बनावट आहे, लोक तंत्रज्ञानाचा कसा गैरवापर करत आहेत. मी प्रत्येकाला विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने हा व्हिडिओ, ॲप आणि प्रमोशनची तक्रार करावी, असं सचिनने म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com