mumbai indians 1st win over delhi capitals in ipl 2024 fans react on hardik pandya visiting mahadev temple amd2000
mumbai indians 1st win over delhi capitals in ipl 2024 fans react on hardik pandya visiting mahadev temple amd2000twitter

Hardik Pandya: हार्दिकला 'महादेव'पावले! मुंबईच्या पहिल्या विजयानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

Hardik Pandya Memes: मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला आहे.

Mumbai Indians, Hardik Pandya Memes:

मुंबई इंडियन्सला आयपीएअ २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून,दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून तर तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला नमवत मुंबई इंडियन्सने आपला पहिला विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

सलग ३ सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाला १ आठवड्यांची विश्रांती मिळाली. या ब्रेकदरम्यान हार्दिक पंड्याने सोमनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. दर्शन घेऊन परतल्यानंतर पहिल्याच सामन्यात विजयाचा श्रीगणेशा केला आहे. दिल्लीला पराभूत केल्यानंतर हार्दिक पंड्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मुंबई इंडियन्स संघाचा एक फोटो शेअर केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, 'पॉवर ऑफ महाकाल' अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका युजरने लिहिलंय की, 'हा मंदिरात जाण्याचा परिणाम आहे.

mumbai indians 1st win over delhi capitals in ipl 2024 fans react on hardik pandya visiting mahadev temple amd2000
IPL 2024, Points Table: पहिलाच विजय अन् मुंबईची मोठी झेप! गुणतालिकेचं समीकरण बदललं

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना ७ एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याने सोमनाथ मंदिरात हजेरी लावली होती.त्याचे सोमनाथ मंदिरात दर्शन घेत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले होते. (Cricket news in marathi)

मुंबईचा शानदार विजय...

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी (७ एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटकअखेर २३४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करतानात दिल्ली कॅपिटल्स संघाला २०५ धावा करता आल्या. हा सामना मुंबई इंडियन्स संघाला ३४ धावांनी गमवावा लागला आहे.

mumbai indians 1st win over delhi capitals in ipl 2024 fans react on hardik pandya visiting mahadev temple amd2000
IPL 2024, Points Table: पहिलाच विजय अन् मुंबईची मोठी झेप! गुणतालिकेचं समीकरण बदललं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com