Complaint Against MS Dhoni: कॅप्टन कुलच्या नावे सर्वाधिक तक्रारी! होऊ शकते कारवाई; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ms Dhoni: नेहमीच कुल राहणारा आणि वादात न अडकणारा एमएस धोनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
MS Dhoni
MS Dhoni Saam Tv

Complaint On MS Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. सध्या तो आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करतोय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरीदेखील त्याची लोकप्रियता काही कमी झाली नाहीये. सोशल मीडियावर त्याचे फॉलोवर्स आणि लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

दरम्यान मैदानावर नेहमीच कुल राहणारा आणि वादात न अडकणारा एमएस धोनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

MS Dhoni
IPL 2023 Playoff Equation: दिल्लीच्या विजयाने वाढलं पंजाबचं टेन्शन! तर 'हे' ३ संघ करू शकतात Playoff मध्ये प्रवेश

एमएस धोनीच्या विरोधात आलेल्या तक्रारींची नोंद भारतीय विज्ञापन मानक परिषद म्हणजेच एएससीआयनं घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, आतापर्यंत जितक्या तक्रारी आल्या आहेत, त्यात एमएस धोनीबाबत जास्त तक्रारी आहेत.

त्यामुळे आम्हाला त्याच्यावर कारवाई करायची की नाही याबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. एमएस धोनीसह प्रसिद्ध युट्युबर भूवम बमच्या नावाचा देखील या यादीत समावेश आहे.

एएससीआयचं म्हणणं आहे की , जाहिरात क्षेत्रात असणाऱ्या सेलिब्रिटींविरुद्ध आलेल्या तक्रारीची आता दखल घेतली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्याकडे आलेल्या तक्रारींची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यात प्रसिद्ध क्रिकेटपटू एमएस धोनी आणि प्रसिद्द युटयूबर भूवम बम यांच्या नावाचा समावेश आहे. (Latest sports updates)

MS Dhoni
IPL 2023 Points Table: RCB साठी 'करो या मरो', पराभुत होताच मुंबई नव्हे तर 'हे' २ संघ थेट करणार Playoff मध्ये प्रवेश

या अहवालानुसार, २०२२-२०२३ वर्षात भारतातील सर्वात चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींविरोधात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या तक्रारींची संख्या ५०३ वर जाऊन पोहोचली आहे. जर गेल्या वर्षीची यादी पाहिली तर, गेल्या वर्षी हा आकडा केवळ ५५ इतका होता. उपभोक्ता संरक्षण अधिनियमानुसार,ज्या सेलिब्रिटींविरोधात तक्रार दाखल केली गेली आहे, त्यांच्याविरूद्ध लवकरच दखल घेत कारवाई केली जाणार आहे.

जाहिरात क्षेत्रात काम करताना काही अटी शर्तींचं पालन करावं लागतं. मात्र काही सेलेब्रिटींना ते करता येत नाही. त्यांनतर अनेक तक्रारी देखील केल्या जातात. भारतीय संघाच्या माजी कर्णधारावर सर्वाधिक १० तक्रारींची नोंद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com