MI vs PBKS Head to head record mumbai indians vs Punjab kings record news in marathi amd2000
MI vs PBKS Head to head record mumbai indians vs Punjab kings record news in marathi amd2000twitter

MI vs PBKS, Head To Head Record: मुंबईसाठी प्रतिष्ठेची लढत! कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

Mumbai Indians vs Punjab Kings: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

दोन्ही संघांना जर प्लेऑफपर्यंतचा प्रवास गाठायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल. या दोन्ही संघांनी प्रत्येकी ६-६ सामने खेळले आहेत. यादरम्यान दोन्ही संघांना २-२ सामने जिंकता आले आहेत. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ या हंगामात संघर्ष करताना दिसून आला आहे. या दोन्ही संघांना अजूनही सूर गवसलेला नाही. या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ ३१ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान पंजाब किंग्ज संघाने १५ सामने जिंकले आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाला १६ सामने जिंकता आले आहेत. हा रेकॉर्ड पाहता दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत बरोबरीची लढत पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

MI vs PBKS Head to head record mumbai indians vs Punjab kings record news in marathi amd2000
GT vs DC ,IPL 2024: शाहरुख खानच्या स्टम्पिंगवरुन पेटला वाद! अंपायर की रिषभ; नेमकी चूक कोणाची?

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

मुंबईला या हंगामातही हवी तशी सुरुवात करता आली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुढील २ सामने जिंकत या संघाने शानदार कमबॅक केलं. मुंबईला गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. असं असलं तरीदेखील हार्दिक पंड्या प्लेइंग ११ मध्ये फार काही बदल करणार नाही. रोहित शर्मा आणि इशान किशन डावाची सुरुवात करताना दिसून येतील. तर सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड हे फलंदाजीत योगदान देताना दिसून येतील. तर जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल, आकाश मधवाल आणि कोएत्जी यांच्यावर गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी असणार आहे.

MI vs PBKS Head to head record mumbai indians vs Punjab kings record news in marathi amd2000
IPL Winner Prediction: लिहून घ्या, हाच संघ जिंकणार IPL ची ट्रॉफी! दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, टीम डेव्हिड, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल आणि गेराल्ड कोएत्जी.

पंजाब किंग्ज- जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, लियाम लिविंगस्टन, सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, शशांक सिंग, हरप्रीत बराड़ आणि कगिसो रबाडा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com