MI vs CSK Match IPL 2023 Update : मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलचा 12वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात धोनीने नानेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईने निर्धारित 20 षटकात 8 बाद 157 धावा केल्या आहेत. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 32 आणि टिम टेव्हिडने 31 धावांची खेळी केली. तर चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. चेन्नईसमोर आता विजयासाठी 158 धावांचे लक्ष आहे.
या सामन्यात रोहित शर्मा आणि इशान किशनने संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. परंतु त्यानंतर दोघांच्या एकामागोमाग एक विकेट पडल्या आणि संघाचा डाव गडगडला. यानंतर कोणत्याही खेळाडून ख्रिजवज जास्त वेळ पाय रोऊन उभे राहता आले नाहे.
तिलक वर्मा आणि टीम डेव्हीने थोडी संयमाने आणि थोडी आक्रमक खेळी करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. या सामन्यात मुंबईकडून रोहित शर्माने 21, इशान किशन 32, तिलक वर्मा 22, टीम डेविडने 31 ऋतिक शौकीनने 18 धावांची खेळी केली. मुंबईच्या कोणत्याही खेळाडूला अर्धशतकी खेळी करता आली नाही. (Sports News)
चेन्नईच्या फलंदाजांनी सुरुवातीला फटके खाल्ले मात्र नतंर त्यांनी मुंबईच्या फलंदाजांचा टिकाव लागू दिला नाही. सलग आक्रमक गोलंदाजी करत त्यांनी मुंबईच्या स्कोअरबोर्डवर ब्रेक लावला. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर तुशार देशपांडे आणि मिशेल सॅटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय सिसांडा मगालानेही एक विकेट घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.