आणखी एका भारतीय खेळाडूचा क्रिकेटमधून संन्यास; USA कडून खेळण्याची शक्यता

कसोटीपटू अजय शर्माचा मुलगा मनन शर्मा आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला जाणार आहे.
आणखी एका भारतीय खेळाडूचा क्रिकेटमधून संन्यास; USA कडून खेळण्याची शक्यता
आणखी एका भारतीय खेळाडूचा क्रिकेटमधून संन्यास; USA कडून खेळण्याची शक्यताSaam Tv
Published On

भारतीय संघाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), ऋषभ पंत, इशांत शर्मा आणि शिखर धवन यांच्यासोबत दिल्ली संघासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मनन शर्माने (Manan Sharma) भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कसोटीपटू अजय शर्माचा मुलगा मनन शर्मा आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला जाणार आहे. मनन आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळतानाही दिसू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपुर्वी 2012 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद यांने संन्यास घेतला होता, त्याने आता अमेरिकेत क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे.

मनन शर्मा 2010 च्या भारतीय 19 वर्षांखालील संघाचा भाग होता. ज्यात केएल राहुल, मयंक अग्रवाल, संदीप शर्मा आणि जयदेव उनाडकट सारखे खेळाडू होते. या सर्व खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली, पण मधल्या फळीतील फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मनन शर्माला भारतीय संघात कधीही स्थान मिळाले नाही. प्रथमश्रेणी क्रिक्रेटमध्ये त्याचे आकडे चांगले आहेत. परंतू त्याला कधीच भारतीय संघात स्थान मिळाले नाही.

आणखी एका भारतीय खेळाडूचा क्रिकेटमधून संन्यास; USA कडून खेळण्याची शक्यता
IPL 2021: CSK आणि MI चा विलगिकरण कालावधी पुर्ण; ट्रेनिंगला करणार सुरुवात

दरम्यान, मनन शर्माने 35 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 1 शतक आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने 1208 धावा केल्या आहेत. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 113 बळीही घेतले आहेत. याशिवाय त्याने 59 लिस्ट ए एकदिवसीय सामन्यांमध्ये 560 धावा केल्या आहेत आणि 78 बळी देखील घेतले आहेत. त्याने 26 टी -20 सामन्यांमध्ये 131 धावा आणि 32 बळी घेतले आहेत. मनन शेवटचा क्रिक्रेट सामना ऑक्टोबर 2019 मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळला होता. गेल्या तब्बल दोन वर्षांपासून त्याला भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्येही संधी मिळालेली नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेल्या नियमानूसार कोणताही भारतीय खेळाडू भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याशिवाय कोणत्याही परदेशी लीग किंवा फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळू शकत नाही. टी 10 लीगमध्ये खेळल्यामुळे युवराज सिंगला परत खेळता आले नव्हते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com