महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्ज इंडियन (CSK) प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी गुरुवारपासून दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये (ICC Cricket Academy) सुरू करणार आहे. त्याचबरोबर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा (MI) संघ शुक्रवारपासून शेख जायद स्टेडियमवर आपली तयारी सुरू करणार आहे. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना, या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की दोन्ही संघांनी त्यांचा 6 दिवसांचा विलगिकरण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि दोन्ही संघ ट्रेनिंगसाठी सज्ज आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, “दोन्ही संघांनी विलगिकरण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि आता ते आयपीएलची तयारी सुरू करणार आहेत. सीएसके दुबई येथील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये आज रात्रीपासून प्रशिक्षण सुरू करणार. तर दुसरीकडे, मुंबईचा संघ शुक्रवारपासून शेख जायद स्टेडियममधील प्रशिक्षण सुरु करणार आहे. गेल्या वर्षीचा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ शनिवारी यूएईला पोहोचणार आहे. गेल्या आठवड्यात चेन्नई आणि मुंबईतील संघ यूएईला पोहोचले होते.
आयपीएलचा 14 वा हंगाम भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान आयोजीत करण्यात आला होता. परंतु काही खेळाडू आणि क्रीडा कर्मचारी कोरोना बाधित झाल्याचे आढळले. मेच्या सुरुवातीला ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. तेव्हापर्यंत 29 सामने खेळले गेले होते. आता उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. एकूण 13 सामने दुबई, 10 शारजाह आणि 8 अबू धाबी येथे होणार आहेत. अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.