LSG vs MI, Playing XI: मुंबईसाठी 'करो या मरो'ची लढत! दोन्ही संघ या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

LSG vs MI, Playing XI Prediction News: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज (३० एप्रिल) हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊ सुपरजायंट्सचा संघ आमने सामने येणार आहे.
मुंबईसाठी 'करो या मरो'ची लढत! दोन्ही संघ या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात
LSG vs MI Playing XI Prediction lucknow super giants vs mumbai indians playing 11 news in marathi amd2000saam tv

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज (३० एप्रिल) हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊ सुपरजायंट्सचा संघ आमने सामने येणार आहे. लखनऊचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ नवव्या स्थानी आहे. मुंबईला जर प्लेऑफच्या शर्यतीती टीकून राहायचं असेल, तर कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

मुंबई इंडियन्य संघातील या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर..

मुंबई इंडियन्स संघात एकापेक्षा एक स्टार फलंदाज आहेत. मात्र या फलंदाजांना अजूनही हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवसारखे प्रमुख फलंदाज आपली छाप सोडण्यात अपयशी ठरले आहे. तर कर्णधार हार्दिक पंड्या गोलंदाजी आणि फलंदाजीतह फ्लॉप ठरला आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात स्थान मिळवण्यसाठी हार्दिक पंड्याला स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्याची शेवटची संधी असू शकते.

मुंबईसाठी 'करो या मरो'ची लढत! दोन्ही संघ या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात
Hardik Pandya Statement: मुंबईच्या पराभवाला हार्दिकने या खेळाडूला ठरवलं कारणीभूत! म्हणाला...

लखनऊ सुपर जायंट्स संघातील या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर..

लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुलने या स्पर्धेत धावा तर केल्या आहेत, मात्र त्याला पावरप्लेमध्ये हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. त्याने पावरप्लेमध्ये संथ गतीने सुरुवात केली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने १४४.२७ त्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तर रिषभ पंतने १६०.६० आणि संजू सॅमसनने १६१.०८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत .

मुंबईसाठी 'करो या मरो'ची लढत! दोन्ही संघ या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात
T20 World Cup 2024: टीम इंडियाबाबत मोठी बातमी! हार्दिक पंड्याऐवजी या खेळाडूला मिळू शकते संधी

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११...

मुंबई इंडियन्स..

रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, हार्दिक पंड्या( कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयुष चावला, ल्युक वूड, जसप्रीत बुमराह

लखनऊ सुपरजायंट्स ..

क्विंटन डी कॉक, केएल राहुल(यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुड्डा, निकोलस पुरन, क्रुणाल पंड्या, मणिमारन सिद्धार्थ, मॅट हेनरी, रवि बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकुर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com