Football News: अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याचा चाहतावर्ग हा जगभर पसरलेला आहे. आता त्याच्या चाहत्यांना निराश करणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. लिओनेल मेस्सीला २ आठवड्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. काय आहे कारण? जाणून घ्या.
जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेन कडून खेळणाऱ्या मेस्सीला २ आठवड्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याला आपल्या पत्नीसह फिरायला जाणं महागात पडलं आहे. तो परवानगीशिवाय आपली पत्नी आणि मुलांसह सौदी अरेबिया फिरायला गेला होता.
गेल्या आठवड्यात तो कुटुंबासह फिरायला गेला होता. मात्र आता फिरायला जाणं त्याला महागात पडलं आहे. कारण आता दोन आठवडे तो या संघाकडून खेळताना दिसून येणार नाहीये. (Lionel Messi Suspended)
या प्रकरणाबाबत अधिक माहिती असणाऱ्या एका सूत्राने एएफपी या वृत्तसंस्थेला म्हटले की, 'लिओनेल मेस्सीवर अनेक दिवसांची बंदी घालण्यात येणार आहे. तर फ्रान्समधील अनेक माध्यम संस्थानी अशी माहिती दिली आहे की, त्याच्यावर २ आठवड्यांसाठी बंदी घालणार येणार आहे. सूत्रानुसार, या काळात मेस्सी सराव करू शकत नाही, तो खेळू शकत नाही आणि त्याच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईमुळे त्याला पैसे दिले जाणार नाहीत. (Latest sports updates)
अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धा जिंकून देण्यात लिओनेल मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. लिओनेल मेस्सी येणाऱ्या महिन्यात ३६ वर्षांचा होणार आहे. रविवारी तो पॅरिस सेंट-जर्मेनसाठी लीग १ मध्ये लॉरिएंट संघाविरुद्ध सामना खेळताना दिसून आला होता. या सामन्यात लॉरिएंट संघाने जोरदार कामगिरी करत पॅरिस सेंट-जर्मेनचा ३-१ ने धुव्वा उडवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.