
नवी दिल्ली : आई-वडिलांनी मुलीला अनाथ आश्रमाजवळील कचराकुंडीत फेकून दिलं. पुढे जाऊन ऑस्ट्रेलियाची क्रिकेट स्टार खेळाडू झाली. भारताच्या लैलाने ऑस्ट्रेलियात जाऊन लिसा स्थळेकर होऊन क्रिकेट क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे. हीच लिसा पुढे ऑस्ट्रेलियाच्या संघाची कर्णधार झाली. तसेच अष्टपैलू होण्याचाही मानही पटकावला. ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसाचा जन्म हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात झाला.
ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसाचं भारतातील नाव लैला होतं. अनाथालयात तिचं 'लैला' असं नामकरण करण्यात आलं होतं. लिसा भारतातून अमेरिकेला पोहोचली. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियाला गेली. ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाल्यानंतर इतिहासाच्या पानावर तिने नाव नोंदवलं.
लिसाचा जन्म १३ ऑगस्ट १९७९ रोजी पुण्यात झाला होता. तिच्या आई-वडिलांनी तिला पुण्यातील श्रीवत्स अनाथालयाबाहेरील कचराकुंडीत फेकून पळ काढला होता. श्रीवत्स अनाथालयात या मुलीचं 'लैला' असं नामकरण करण्यात आलं. पुढे डॉ. हारेन आणि त्यांची पत्नी सू यांनी तिला दत्तक घेतलं. त्यांनी तिला अमेरिकेला नेलं. डॉ. हारने हे भारतीय वंशाचे होते. तर त्यांची पत्नी इंग्लंडची होती.
लिसाला दत्तक घेतल्यानंतर डॉ. हारेन आणि त्यांची पत्नी सू या ऑस्ट्रेलियात सिडनीला राहायला गेले. या दाम्पत्यांनी मुलीसोबत क्रिकेट खेळणे सुरु केले. पुढे लिसा आवडीने क्रिकेट खेळू लागली. पुढे लिसाने ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळवलं. तिने क्रिकेटसोबत शिक्षणही सुरु ठेवलं होतं. लिसाने २००१ साली एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रलियासंघासाठी डेब्यू केलं.
लिसाने पुढे क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळू लागली. चांगल्या कामगिरीमुळे लिसा ऑस्ट्रेलियाची कर्णधार झाली. त्यानंतर लिसाने मागे वळून पाहिलं नाही. तिने वनडे आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ४ विश्वचषक स्पर्धेतही सहभाग नोंदवला आहे.
लिसा स्थळेकर १००० धावा करणारी आणि १०० गडी बाद करणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली. तिने क्रिकेट करिअरमध्ये आयसीसी रँकिंगमध्येही पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावलं होतं. लिसाने २००१ साली आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं. तर २०१३ साली निवृत्ती घेतली. १२ वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये लिसा ऑस्ट्रेलियासाठी ८ कसोटी सामने, १२५ वनडे आणि ५४ टी-२० आंतराष्ट्रीय सामने खेळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.