KL Rahul Century : केएल राहुलचा इंग्लंडमध्ये कहर, लॉर्ड्सवर ठोकलं खणखणीत शतक

Ind Vs Eng 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स स्टेडियमवर रंगला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सलामीवीर केएल राहुलने खणखणीत शतक ठोकले आहे.
kl rahul scores century in lords
kl rahul scores century in lordsx
Published On

Ind Vs Eng : कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्समध्ये सुरु आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी केएल राहुल चमकला आहे. केएल राहुलने लॉर्ड्सवर शतक ठोकले आहे. मालिकेतील हे केएल राहुलचे दुसरे शतक आहे. सध्या तो चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. आज तिसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी सुरु झाल्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी मैदानात उतरली. जैस्वाल लवकर बाद झाला. त्यानंतर करुण नायर पाठोपाठ शुभमन गिलची विकेट पडली. एका बाजूने विकेट्स पडत असताना केएल राहुल टिकून खेळला. तिसऱ्या दिवशी रिषभ पंतच्या साथीने केएल राहुलने चांगली भागीदारी केली.

आज (१२ जुलै) लॉर्ड्स कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आहे. काल (११ जुलै) इंग्लंडचा संघ ३८७ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर भारतीय सलामी जोडी मैदानात उतरली. दिवसाअखेरीस भारताने १४५ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल (१३ धावा), करुण नायर (४० धावा) आणि कॅप्टन शुभमन गिल (१६ धावा) अशा प्रकारे ३ विकेट्स पडल्या. त्यानंतर केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी खेळ सावरला.

kl rahul scores century in lords
Jasprit Bumrah : लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराहचा जलवा, शतकवीर रूटसह कॅप्टन स्टोक्सही चक्रावला; इंग्लंडच्या अडचणी वाढल्या

लीड्सच्या मैदानावर पहिल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुलने शतक केले होते. त्याने १३७ धावांची दमदार खेळी केली होती. एकूण कसोटी मालिकेमध्ये केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. फक्त फलंदाजीच नाही, तर क्षेत्ररक्षणातही तो चांगला खेळ करत आहे. लॉर्ड्स कसोटीतील केएल राहुल आणि रिषभ पंत यांच्या भागीदारीमुळे भारत सध्या मजबूत स्थितीत आहे.

kl rahul scores century in lords
Ind Vs End : लॉर्ड्सवर टीम इंडियाचा विजय पक्का, सामना जिंकून भारत मालिकेत आघाडी घेणार; फक्त...

तिसऱ्या कसोटीत आतापर्यंत काय घडलं?

भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा डाव ३८७ धावांवर संपला. इंग्लंडकडून जो रूटने शतकीय कामगिरी केली. जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी अर्धशतकीय खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्यापाठोपाठ मोहम्मद सिराज आणि नितीशकुमार रेड्डी यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.

kl rahul scores century in lords
Shubman Gill : सारा तेंडुलकरची आई शुभमन गिलसमोर बसली, रवींद्र जडेजानं चांगलीच फिरकी घेतली; पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com