KL Rahul : केएल राहुल क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? स्वतःच केला मोठा खुलासा

KL Rahul Retirement Rumors : भारताचा सर्वात भरवशाचा फलंदाज केएल राहुल निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पण याबाबत त्यानं स्वतःच खुलासा केला आहे. जगात आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, असं तो मिश्किलपणे म्हणाला.
KL Rahul Retirement Fact Check News
KL Rahul Retirement Fact Check Newssaam tv
Published On

भारतीय क्रिकेट संघाचा खमका आणि सर्वात भरवशाचा फलंदाज केएल राहुल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत त्यानं आता स्वतःच खुलासा केला आहे. निवृत्तीबाबतचा विचार मनात आला होता; पण सध्याच्या परिस्थितीबाबत राहुलनं सर्व काही स्पष्ट केलं आहे. केएल राहुल सध्याचा भरवशाचा खेळाडू आहे. कसोटी आणि वनडे फॉरमॅटमध्ये तो सातत्यानं खेळतोय. टी २० क्रिकेटमधील त्याची जागा अनिश्चित आहे.

निवृत्ती घ्यावी असा विचार आला पण...

केएल राहुल भारताच्या कसोटी संघात सलामीवीर म्हणून खेळतोय. विशेष म्हणजे वनडे संघात तो मॅच फिनिशरच्या भूमिकेत आहे. इतकेच नाही तर तो यष्टीरक्षकाची भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावताना दिसतोय. सध्या या दोन्ही फॉरमॅटमध्ये तगडी कामगिरी करणारा केएल राहुल यानं एका मुलाखतीत निवृत्ती घेण्याचा विचार मनात आला होता असं सांगितलं आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं. याबाबत त्यानं स्वतः खुलासा केला आहे. निवृत्तीचा विचार मनात आला पण नंतर अजून बराच वेळ आहे, असं वाटलं. त्यामुळेच सध्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं आहे, असं तो म्हणाला.

अजून बराच वेळ आहे....

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याला दिलेल्या मुलाखतीत त्यानं निवृत्तीच्या चर्चा आणि सध्याचं क्रिकेट याबाबत चर्चा केली. केएल राहुल म्हणाला की, निवृत्तीचा निर्णय काही कठीण नाही. पण याच्या व्यतिरिक्त जगात बरंच काही आहे. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, यासंदर्भातील योग्य निर्णय योग्य वेळेला घेतला जाईल. ही एक अशी गोष्ट आहे की ती अधिक वेळ टाळता येणार नाही. पण निवृत्तीला अद्याप बराच वेळ आहे.

कसोटी आणि वनडे करिअर

१९९२ मध्ये केएल राहुलचा जन्म झाला. आता तो ३३ वर्षांचा आहे. राहुलने आतापर्यंत भारताकडून ६७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात चार हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात ११ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये ९४ सामने खेळला आहे. ३३६० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर वनडेमध्ये आठ शतके आणि २० अर्धशतके आहेत. या दोन्ही फॉरमॅटमध्ये तो सातत्याने खेळतो आहे.

KL Rahul Retirement Fact Check News
T20 वर्ल्ड कपपूर्वी आनंदाची बातमी; टीम इंडियाच्या धुरंधर फलंदाजाची वापसी, किवींची आता खैर नाही

२०२२ मध्ये अखेरचा टी २० सामना

केएल राहुल सध्या टी २० संघात नाही. आतापर्यंत ७२ सामन्यांत त्यानं २२६५ धावा केल्या आहेत. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे २ शतके आणि २२ अर्धशतके आहेत. २०२२ मध्ये तो अखेरचा टी २० सामना खेळला होता. त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. आयपीएलमध्ये तो खेळत असून, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि एलएसजी या संघांचं प्रतिनिधित्व केले आहे. संघाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे.

KL Rahul Retirement Fact Check News
WPLमध्ये घडला इतिहास; मुंबई इंडियन्सच्या फलंदाजानं ५७ चेंडूत ठोकलं शतक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com