आता 'राजीव गांधी खेलरत्न' नव्हे, 'मेजर ध्यानचंद खेलरत्न'

मात्र राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याची खरंच गरज आहे का, हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.
आता 'राजीव गांधी खेलरत्न' नव्हे, 'मेजर ध्यानचंद खेलरत्न'
आता 'राजीव गांधी खेलरत्न' नव्हे, 'मेजर ध्यानचंद खेलरत्न'Saam tv
Published On

नवी दिल्ली : भारतातील सर्वात उच्च पुरस्कार म्हणून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Khelratna Award) ओळखला जातो. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ऑलम्पिक खेळांची चर्चा आहे. अशातच टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) प्रत्येक देशातील खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत, तर भारतही यात मागे नाही. मीराबाई चानूपासून रवी दहियापर्यंत सर्वांनी भारताला पदक मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे, मेरी कॉम, पीव्ही सिंधू, भारतीय पुरुष, महिला हॉकी संघ किंवा तिरंदाज अशा अनेक खेळातील खेळाडूंनी देशाला पदके मिळवून दिली आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक निर्णय घेतला आहे. (Khelratna Award now renamed as Major Dhyanchand Khelratna)

आता 'राजीव गांधी खेलरत्न' नव्हे, 'मेजर ध्यानचंद खेलरत्न'
Tokyo Olympics 2020: राज्यातील महिला खेळाडूंना 50 लाख रुपये बक्षीस

नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyanchand Khel Ratna Award) असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाला संदेश दिला आहे. "राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या भावनांचा आदर म्हणून आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलं जात आहे."

तसेच, जगभरात क्रिडा क्षेत्रात भारताचे नाव उंचावण्यासाठी आणि देशाला गौरवान्वित करण्यासाठी मेजर ध्यानचंद यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याची खरंच गरज आहे का, हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.

- राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतातील खेळ जगतातला सर्वात उच्च पुरस्कार आहे. क्रिडा क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरी कऱण्याऱ्या खेळांडूना दिला जाणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात 1991-92 मध्ये झाली. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.

- आतापर्यंत कोणाकोणाला हे पुरस्कार देण्यात आले

१९९१ मध्ये बुद्धिबळ खेळात भारताचे नाव उंचावणारे विश्वनाथन आनंद यांना सर्वात पहिल्यांदा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हॉकीसाठी धनराज पिल्ले, टेनिससाठी लिएंडर स्पेस, बॅटमिंटनसाठी पुलेला गोपीचंद, नेमबाजीसाठी अभिवन बिंद्रा, मास्टरब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडूलकर, एम.एस धोनी आणि विराट कोहली, मुष्टीयुद्ध खेळासाठी मेरी कॉम, कुस्तीसाठी सुशील कुमार, साक्षी मलिक, योगेश्वर दत्त, विनेश फोगाट, बजरंग पुनिया. टेनिससाठी सानिया मिर्झा, ह़ॉकीसाठी रानी रामपाल, टेबलटेनिससाठी मनिका बत्रा अशा एक ना अनेक खेळामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना आतापर्यंत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- पुरस्काराचे स्वरुप

खेलरत्न पुरस्काराचा उद्देश खेळाडूंचा सन्मान करणे आणि समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढवणे हा आहे. पुरस्कारामध्ये खेळाडूंना सन्मान म्हणून पदक, सन्मानासह प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस मिळते. 2004-05 पर्यंत बक्षीसाची रोख रक्कम 5,00,000 रुपये होती. त्यानंतर क्रिडा मंत्रालयाने रक्कम वाढवून 7,50,000 रुपये इतकी केली. त्यानंतर पुन्हा क्रिडामंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षिसाच्या रकमेत गेल्यावर्षी वाढ केली. आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडूंना आता 7.5 लाखांऐवजी 25 लाख रुपये मिळणार आहेत.

- खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूंचे नामांकन कसे केले जाते.

कोणत्याही वर्षासाठी खेळाडूचे नामांकन 30 एप्रिल पर्यंत स्वीकारले जातात. मात्र याच एकाच खेळातील दोन खेळाडूंचे नामांकन केले जात नाही. बारा सदस्यीय समिती ऑलिम्पिक गेम्स, पॅरालिम्पिक गेम्स, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स अशा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील खेळाडूच्या कामगिरीचे मूल्यांकन करते. ही समिती नंतर आपल्या शिफारशी क्रीडा आणि युवक मंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवते.

आता 'राजीव गांधी खेलरत्न' नव्हे, 'मेजर ध्यानचंद खेलरत्न'
'बजरंग' बली की जय! इराणच्या पैलवानाला आस्मान दाखवत उपांत्यफेरीत

- मेजर ध्यानचंद पुरस्कार

मेजर ध्यानचंद पुरस्कारदेखील भारताचा सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार आहे. एखाद्या खेळाडूच्या आजीवन कार्याचा सन्मान म्हणून पुरस्कार दिला जातो. म्हणून याला अधिकृतपणे क्रीडा क्षेत्रातील जीवन गौरव ध्यानचंद पुरस्कार असे नाव देण्यात आले आहे. भारताचे प्रसिद्ध फील्ड हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग (1905-1979) यांच्या नावावर या पुरस्काराचे नाव आहे. क्रीडा आणि युवक मंत्रालय 2002 पासून दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करते. प्राप्तकर्त्यांची निवड मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीद्वारे केली जाते आणि त्यांच्या सक्रिय क्रीडा कार्यकाळात आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या योगदानासाठी सन्मानित केले जाते. 2016 पर्यंत, पुरस्काराचे स्वरुप एक प्रतिमा, प्रमाणपत्र, औपचारिक पोषाख आणि 5 लाख रुपयांचे रोख असे होते.

- मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते खेळाडू

मुष्टियुद्ध खेळासाठी शाहूराज बिराजदार, हॉकीसाठी अशोक दिवान, रोमियो जेम्स, सुमराई टेटे, फुटबॉलसाठी सैय्यद हाकिम, टेनिससाठी शिव मिश्रा, जलतरण खेळासाठी के.पी ठक्कर यांच्यासह आतापर्यंत अनेक खेळाडूंना मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com