WTC Final 2023 Key Player: टीम इंडियासाठी हुकमी एक्का ठरणार 'हा' खेळाडू! स्वतः ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने सांगितलं नाव

Jason Gillespie On Mohammed Shami: या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलस्पीने मोठे वक्तव्य केले आहे.
team india
team indiasaam tv
Published On

IND VS AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलस्पीने मोठे वक्तव्य केले आहे.

गिलस्पीचं म्हणणं आहे की, जर ७ ते ११ जून दरम्यान मोहम्मद शमीच्या चेंडूला रिव्हर्स स्विंग मिळाला तर तो ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची चिंता वाढवू शकतो.

team india
WTC Final 2023 Weather Report: WTC च्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कोण होणार वर्ल्ड चॅम्पियन?

भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज...

मोहम्मद शमी संघाबाहेर असल्याने मोहम्मद शमीवर मोठी जबाबदारी असणार आहे. कारण मोहम्मद शमी हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. शमीचा आत्मविश्वास देखील वाढलेला असणार आहे.

कारण नुकताच त्याने आयपीएल स्पर्धेत २८ गडी बाद पर्पल कॅप पटकावली आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना देखील ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड जबरदस्त राहिला आहे. त्याने ११ कसोटी सामन्यांमध्ये ४० गडी बाद केले आहेत. यादरम्यान ५६ धावा खर्च करत ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

काय म्हणाला जेसन गिलस्पी?

मोहम्मद शमी बाबत बोलताना जेसन गिलस्पी म्हणाला की, ' शमीने मला खूप प्रभावित केले आहे. तो मला खूप आवडतो. तो प्रचंड मेहनत घेत आहे. तो उत्तम प्रकारे चेंडू रिलीज करतो. त्याची बोटं ही बरोबर सिमच्या मागे असतात. त्यामुळे परिस्थिती अनुकूल असल्यास तो चेंडू स्विंग करू शकतो.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' जर खेळपट्टीतून कुठलीही मदत मिळत असेल तर त्या परिस्थितीत तो मोलाची भूमिका बजावू शकतो. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज डिफेन्सिव खेळ करतील. मात्र शमी आपल्या गोलंदाजीने त्यांना चांगलाच जाब विचारू शकतो. ' (Latest sports updates)

team india
WTC Final Playing 11: WTC च्या अंतिम सामन्यात R Ashwin राहणार संघाबाहेर?,स्वतः प्रशिक्षकाने सांगितलं कारण

मोहम्मद सिराजकडून मोठ्या अपेक्षा..

आयपीएल २०२३ स्पर्धेत मोहम्मद सिराज हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याने या हंगामात १९ गडी बाद केले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ६ कसोटी सामने खेळताना त्याने १४ गडी बाद केले आहेत.

मोहम्मद सिराजबाबत बोलताना जेसन गिलस्पी म्हणाला की, ' सिराज एक उत्तम युवा गोलंदाज मात्र तो वेगळ्या प्रकारचा गोलंदाज आहे. तो आक्रमक होऊन गडी बाद करण्याचा प्रयत्न करेन. मात्र तो शमीपेक्षा वेगळा गोलंदाज आहे. दोघेही उत्तम गोलंदाज आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com