ISPL सिझन 3 जाहीर! सलमान-अजय देवगणमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार, बॉलीवुड सिताऱ्यांसोबत यंदा Porsche चीही क्रेझ

Indian Street Premier League new owners: इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग’ (ISPL) च्या तिसऱ्या सीझनची (ISPL Season 3) आज अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या वर्षी लीगमध्ये मोठे बदल आणि बॉलिवूडचे मोठे स्टार्स सामील झाले आहेत.
Indian Street Premier League
Indian Street Premier Leaguesaam tv
Published On

भारताची पहिली टेनिस बॉल T10 स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या (ISPL) आता तिसऱ्या सिझनला सुरुवात होणार आहे. यंदाचा सिझन अधिक मोठा, दमदार आणि आकर्षक असणार आहे. ही स्पर्धा 9 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 या काळात सुरतमध्ये खेळवली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर (MVP) ठरणाऱ्या खेळाडूला नवीन कोरी Porsche 911 कार भेट म्हणून देण्यात येणार आहे.

सचिन तेंडुलकर, अजय देवगण यांच्या उपस्थितीत घोषणा

ISPL च्या तिसऱ्या सिझनची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. या कार्यक्रमाला लीगचे मुख्य समिती सदस्य सचिन तेंडुलकर, आशीष शेलार, मिनल अमोल काले, लीग कमिशनर सुरज सामत, लीग ऑपरेशन्सचे अध्यक्ष दीपक चौहान आणि अभिनेता अजय देवगण (अहमदाबाद संघाचे मालक) उपस्थित होते.

Indian Street Premier League
BCCI New President: BCCI ला मिळाला नवा बॉस! 'या' माजी क्रिकेटरवर सोपवली अध्यक्षपदाची धुरा

2024 मध्ये सुरू झालेल्या ISPL ला पहिल्या दोन सिझनमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकसंख्या आणि मैदानातील उपस्थिती दरवर्षी झपाट्याने वाढली आहे. लीगमधून अनेक तरुण खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवली. अभिषेक दल्होर, सागर अली, रजत मुंधे, केतन म्हात्रे, जगन्नाथ सरकार आणि फर्दीन kazi यांसारख्या खेळाडूंनी घराघरात नाव कमावलं. त्यामुळे आता तिसऱ्या सिझनमध्ये 8 टीमऐवजी 10 टीम्स सहभागी होतील. यंदा अहमदाबाद आणि दिल्ली हे दोन नवीन संघ सामील झाले आहेत. अहमदाबादचा मालक अभिनेता अजय देवगण, तर दिल्लीचा मालक सलमान खान आहे.

Indian Street Premier League
Asia cup 2025: फायनलआधी राडा! फोटो काढायला सूर्या ब्रिगेडचा नकार, पाकिस्तानचा कर्णधार म्हणतो....

यावेळी सचिन तेंडुलकर म्हणाला की, “ISPL ही केवळ स्पर्धा नसून भारतातील क्रिकेटिंग टॅलेंट शोधण्याच्या आणि घडवण्याच्या पद्धतीत बदल घडवणारी चळवळ बनली आहे. सिझन 3 मुळे अधिकाधिक खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी मिळेल. ही वाढ देशातील गवताच्या मुळांवरील क्रिकेट मजबूत करणार आहे.”

Indian Street Premier League
IND vs PAK Final: ‘सचिन-कोहली’सारखं बुमराह पाकिस्तानला नडणार, म्हणून आज बूम-बूम ठरणार ‘गेम चेंजर’

दरम्यान “ISPL ही परिवर्तन घडवणारी कल्पना आहे. आम्ही क्रिकेट पारंपरिक केंद्रांबाहेरही पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत. झोनल मॉडेलमुळे केवळ ISPL नाही, तर भारतीय क्रिकेटलाही नवीन टॅलेंटचा भक्कम पाया मिळेल, असं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.

लीग कमिशनर सुरज सामत यांनी सांगितलं की, “तीन सिझनमध्ये ISPL एका कल्पनेतून चळवळ बनली आहे. MVP साठी Porsche 911 देणं ही केवळ एक गोष्ट नाही, तर खेळाडूंना मोठं स्वप्न पाहण्याची प्रेरणा आहे. 1985 साली जेव्हा रवी शास्त्रींना Audi मिळाली, तसाच हा प्रेरणादायी क्षण आहे.”

Indian Street Premier League
IND vs PAK Final: ‘सचिन-कोहली’सारखं बुमराह पाकिस्तानला नडणार, म्हणून आज बूम-बूम ठरणार ‘गेम चेंजर’

अहमदाबाद टीमचे मालक अजय देवगण म्हणाले, “क्रिकेट ही प्रत्येकाला जोडणारी भावना आहे आणि ISPL त्याचं खरं रूप दाखवतो. अहमदाबादमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. आमच्या संघातून नवीन हिरो पुढे यावेत हीच अपेक्षा आहे.”

कोण आहेत या लीगमधील टीमचे मालक?

सलमान खान (दिल्ली), अजय देवगण (अहमदाबाद), अमिताभ बच्चन (माझी मुंबई), सैफ अली खान आणि करीना कपूर खान (टायगर्स ऑफ कोलकाता), अक्षय कुमार (श्रीनगर के वीर), सूर्या (चेन्नई सिंगम्स), हृतिक रोशन (बेंगळुरू स्ट्रायकर्स) आणि राम चरण (फाल्कन रायझर्स हैदराबाद).

ट्रायअल्सची सुरुवात कधी होणार?

सिझन 3 साठी ट्रायअल्स 5 ऑक्टोबर 2025 पासून देशभरातील 101 शहरांमध्ये घेतले जाणार आहेत. प्रत्येक टीममधील खेळाडूंची संख्या 18 पर्यंत वाढवली आहे. त्यात दोन अनिवार्य अंडर-19 खेळाडूंचा समावेश असणार आहे. टीमची खर्च मर्यादा 50% ने वाढवून ₹1.5 कोटी करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com