Ishan Kishan: 'जे लोक आज शिवीगाळ करताय, तेच..' हार्दिक पंड्यावर टीका करणाऱ्यांवर इशान किशन जोरदार गरजला

Ishan kishan On Hardik Pandya: हार्दिक पंड्याला ट्रोल करणाऱ्यांना इशान किशनने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Ishan Kishan: 'जे लोक आज शिवीगाळ करताय, तेच..' हार्दिक पंड्यावर टीका करणाऱ्यांवर इशान किशन जोरदार गरजला
ishan kishan with hardik pandyayandex

ट्रोल, शिवीगाळ आणि बुईंगनंतर हार्दिक पंड्याने शानदार खेळ करत सर्वांनाच आपलं कौतुक करायला भाग पाडलं आहे. काही दिवसांपूर्वी त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. मात्र आता तेच ट्रोलर्स त्याचं कौतुक करताना दिसून येत आहे. आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती.

ज्या ज्या वेळी तो मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला, त्यावेळी त्याला शिवीगाळ केली गेली. परिणामी मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. दरम्यान भारतीय संघातून बाहेर असलेल्या ईशान किशनने हार्दिक पंड्याचं कौतुक केलं आहे.

Ishan Kishan: 'जे लोक आज शिवीगाळ करताय, तेच..' हार्दिक पंड्यावर टीका करणाऱ्यांवर इशान किशन जोरदार गरजला
IND vs ZIM: 6,6,6,6,6..झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू सिंगचा कहर! मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीला सोडू शकतो मागे

मुंबई इंडियन्सकडून प्लॉप ठरलेल्या हार्दिक पंड्याला भारतीय टी-२० संघात स्थान दिलं गेलं होतं. हा निर्णय अनेकांना खटकला होता. मात्र हार्दिक पंड्याने सर्वांना चुकीचं ठरवत टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली.

दरम्यान इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना इशान किशन म्हणाला की, ' मला तेव्हाही वाटलं होतं की, हार्दिक पंड्याने आपली सर्वोत्तम कामगिरी वर्ल्डकपसाठी राखून ठेवली आहे. मी त्याने सांगितलेले शब्द कधीच विसरू शकत नाही. तो म्हणाला होता की, एकदा चांगली कामगिरी केली की, जे लोक आज शिवीगाळ करत आहेत, तेच लोक उद्या टाळ्या वाजवून कौतुक करतील. तो म्हणाला होता की लोकांना बोलू द्या आपण आपली सर्वोत्तम कामगिरी करू आणि शंभर टक्के देऊ.'

Ishan Kishan: 'जे लोक आज शिवीगाळ करताय, तेच..' हार्दिक पंड्यावर टीका करणाऱ्यांवर इशान किशन जोरदार गरजला
IND vs ZIM: झिम्बाब्वेचा पराभव करत टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया,पाकिस्तानला मात; तोडला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रेकॉर्ड

आयपीएल २०२४ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघात स्थान देण्यात आलं होतं. त्यानंतर मॅनेजमेंटने कर्णधार रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढलं आणि ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली. या निर्णयामुळे फॅन्स नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते. हार्दिक पंड्या ज्या मैदानावर खेळण्यासाठी गेला तिथे त्याला बुईंगचा सामना करावा लागला. याचा फटका मुंबई इंडियन्सच्या सांघिक कामगिरीवरही झाला. मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत तळाशी होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com