No Ball Controversy: 'नो बॉल नव्हताच, विराटचं असं वागणं चुकीचं..' सामन्यानंतर इरफान पठाणचं मोठं वक्तव्य

Virat Kohli No Ball Controversy: विराट कोहली बाद होता की नाही यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपलं मत मांडलं आहे. दरम्यान इरफान पठाणने एक व्हिडिओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
No Ball Controversy: 'नो बॉल नव्हताच, विराटचं असं वागणं चुकीचं..' सामन्यानंतर इरफान पठाणचं मोठं वक्तव्य
irfan pathan statement on virat kohli wicket explained no ball rule watch video amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या रोमांचक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने १ धावेने विजय मिळवला आहे. २२३ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. संघातील प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतला.

विराटच्या विकेटवरुन मैदानातील वातावरण चांगलंच तापलं. गोलंदाजी करत असलेल्या हर्षित राणाने फुल टॉस चेंडू टाकला. हा चेंडू बॅटला लागुन हवेत गेला आणि हर्षित राणाने सोपा झेल घेतला. विराटने DRS ची मागणी केली. मात्र DRS मध्येही तो बाद असल्याचं दिसून आलं. दरम्यान विराट कोहली बाद होण्यावर आता इरफान पठाणने भाष्य केलं आहे.

सामन्यानंतर इरफान पठाणने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, ' बीसीसीआयने आयपीएलमध्ये खेळत असलेल्या सर्वच खेळाडूंच्या कंबरेची उंची नोंदवून घेतली आहे. याच माहितीचा वापर नो चेंडू आहे की नाही याची पडताळणी करताना केला जातोय. त्यामुळे तंत्रज्ञानाला चुकीचं ठरवता येणार नाही. स्पष्टपणे दिसून येत आहे की, विराट कोहली बाद आहे. मात्र विराटचं हे वागणं चुकलंच.'

No Ball Controversy: 'नो बॉल नव्हताच, विराटचं असं वागणं चुकीचं..' सामन्यानंतर इरफान पठाणचं मोठं वक्तव्य
Virat Kohli Wicket: विराटच्या विकेटवरुन गंभीर थेट अंपायरशी भिडला? KKR - RCB सामन्यातील तो Video व्हायरल

शेवटच्या चेंडूवर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विजय..

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यादरम्यान झालेला हा सामना रोलरकोस्टर राईडपेक्षा कमी नव्हती. कधी इकडे तर कधी तिकडे जात असलेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारली आणि हा सामना १ धावेने जिंकला.

शेवटच्या षटकात कर्ण शर्माने ३ चेंडूत ३ षटकार खेचले. शेवटच्या ३ चेंडूंवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला विजयासाठी ३ धावांची गरज होती. मात्र दुसरी धाव घेत असताना लॉकी फर्ग्युसन धावबाद झाला आणि हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या हातून निसटला.

No Ball Controversy: 'नो बॉल नव्हताच, विराटचं असं वागणं चुकीचं..' सामन्यानंतर इरफान पठाणचं मोठं वक्तव्य
KKR vs RCB, IPL 2024: विराट कोहली खरंच आऊट होता का? वाचा नेमकं काय घडलं - Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com