IPL News: स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या एस श्रीसंतची आयपीएलमध्ये वापसी! मिळाली मोठी जबाबदारी

IPL 2023 Update : दहा वर्षांपूर्वी 2013 साली स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला एस श्रीसंत (S Sreesanth) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसणार आहे.
(S Sreesanth
(S Sreesanthsaam tv
Published On

IPL 2023 Commentary Panel: आयपीएल सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. येत्या 31 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने या मोसमाची सुरुवात होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

दरम्यान आयपीएलचा हा हंगाम सुरू होण्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दहा वर्षांपूर्वी 2013 साली स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला एस श्रीसंत (S Sreesanth) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसणार आहे. यंदाच्या हंगामात त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

(S Sreesanth
T-20 क्रिकेट सोडून दे अन्....; विराट कोहलीला शोएब अख्तरनं दिलेल्या हटके सल्ल्यामुळं क्रिकेटविश्वच चक्रावलं...

एस श्रीसंतकडे मोठी जबाबदारी

आयपीएलचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने स्टार खेळाडूंच्या कॉमेंट्री पॅनलची घोषणा केली आहे. या कॉमेंट्री पॅनलमध्ये माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतचाही समावेश करण्यात आला आहे. एस श्रीसंत पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे.

या पॅनेलमध्ये दोन टी-20 विश्वचषक विजेते कर्णधार पॉल कॉलिंगवूड आणि अॅरॉन फिंच यांचाही समावेश करण्यात आहे. फिंच नऊ आयपीएल फ्रँचायझींकडून खेळला आहे. त्याच्यासोबत इंग्लंड आणि आयपीएलचा माजी दिग्गज केविन पीटरसनही या कॉमेंट्री पॅनेलमध्ये सामील होणार आहे. (Latest Sports News)

(S Sreesanth
Team India : टी २० मध्ये प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारे हे 3 फलंदाज वनडेत का ठरताहेत फेल?

कॉमेंट्री पॅनेलमध्ये कोण कोण दिसणार?

स्टार स्पोर्ट्सच्या कव्हरेजमध्ये डॅनी मॉरिसन हे प्रमुख व्यक्तिमत्त्व असेल. याशिवाय माजी आयपीएल प्रशिक्षक जॅक कॅलिस स्टार स्पोर्ट्स पॅनलवर पदार्पण करणार आहेत. केकेआरचा मार्गदर्शक माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड हसी आणि सीएसकेचा दिग्गज मॅथ्यू हेडन हा देखील या पॅनेलमध्ये कॅलिस आणि पीटरसन यांच्यासोबत दिसणार आहे.

याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी लेगस्पिनर इम्रान ताहिर देखील कॉमेंट्री करताना दिसणार आहे. तसेच माजी आयपीएल प्रशिक्षक टॉम मूडी, डॅनियल व्हिटोरी आणि सायमन कॅटिच रणनीती आणि खेळाचे विश्लेषण करतील. (Latest Marathi News)

हे भारतीय दिग्गजही दिसणार

या पॅनलमध्ये भारताचे दिग्गज सलामीवीर सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि माजी महिला क्रिकेटपटू मिताली राज यांचाही समावेश असेल. याशिवाय मोहम्मद कैफ, हरभजन सिंग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण हे देखील पॅनलवर आहेत. याशिवाय मुरली विजय, लक्ष्मीपती बालाजी, सुब्रमण्यम बद्रीनाथ, संदीप पाटील आणि क्रिश श्रीकांत यांचा देखील या यादित समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com