
जयपूर : विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुने राजस्थानला पराभूत केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थानला ९ विकेट्सने पराभूत केलं. विराट कोहलीनं नाबाद ६२ धावा केल्या. फिल सॉल्टनं ६५ धावा तर देवदत्त पडिकलने ४० धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना आरसीबीला रोखण्यात अपयश आलं. फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीने विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. आरसीबीने ६ पैकी ४ सामन्यात विजय मिळवत ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स ६ पैकी ४ सामन्यात पराभूत झाल्याने त्यांची ७व्या स्थानावर घसरण झाली आहे.
या सामन्यात विराट कोहलीच्या षटकारासाठी चाहते वाट पाहत होते. पण विराट कोहलीने RCB vs RR सामन्यात एक षटकार असा मारला की, त्यामुळे चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण हा चेंडू थेट तिथे उभ्या असलेल्या कॅमेरामनला लागला. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ त्या कॅमेरामनकडे धाव घेतल्याचं पाहायला मिळालं. हा प्रकार घडलो तो १३ व्या षटकात. त्यावेळी कुमार कार्तिकेय गोलंदाजी करत होता. या षटकाच्या अखेरच्या म्हणजेच सहाव्या चेंडूवर हा प्रकार घडला. आरसीबी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली धावांचा पाठलाग करत होता. पण या षटकामधील पाच चेंडूंमध्ये फक्त दोनच धावा आल्या होत्या. त्यामुळे आरसीबीचा रनरेट खाली आला होता. त्यामुळे आता आक्रमक खेळावं लागणारच होतं, आणि कोहलीला ही गोष्ट चांगलीच माहिती होती.
१३व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विराट कोहली मोठा फटका मारण्याच्या उद्देशानेच उभा होता. विराट समोर चेंडू आणि आणि त्याने आपली बॅट अशी फिरवली की, सर्वांनाच आता काय होणार, याची उत्सुकता लागली होती. पण कोहलीच्या या फटक्याचे टायमिंग एवढे अप्रितम होते की, तो झेल होणार नाही, असं सर्वांनाच वाटत होते आणि तसंच घडलंही. कारण विराटने मारलेला हा चेंडू थेट सीमारेषेपार गेला. हा चेंडू सीमारेषेच्या पार गेला मात्र तिथे काम करत असलेल्या एका कॅमेरामनला हा चेंडू खाटकन्... बसला. हा चेंडू एवढ्या जोरात लागला होता की, तो कॅमेरामन तिथेच कळवळला. त्यावेळी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्यामुळे आरसीबीच्या डॉक्टरांनी तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली.
दुसरीकडे विराट कोहलीला आपला चेंडू त्या कॅमेरामनला लागला असल्याचं समजलं. त्यावेळी विराट कोहलीही निराश झाला आणि त्याने आपला हात बॅटवर आपटला. त्यानंतर काही काळ हा कॅमेरामन आपली मान झुकवून बसलेलाच होता. पण थोड्यावेळाने त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. पण त्या कॅमेरामनची प्रकृती आता नेमकी कशी आहे? याची अधिकृतपणे कुणी दिलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.