IPL 2025 Mega Auction: वय वर्ष फक्त १८! IPL लिलावात या युवा खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस

IPL auction: आयपीएल २०२५ स्पर्धेतील युवा खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. कोण आहेत ते युवा खेळाडू? जाणून घ्या
वय वर्ष फक्त १८! IPL लिलावात या युवा खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
VAIBHAV SURYAVANSHITWITTER
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी होणारे मेगा ऑक्शन येत्या २४ आणि २५ नोव्हेंबरला होणार आहे. या ऑक्शनसाठी एकूण १५७४ खेळाडूंनी नाव नोंदवलं होतं. यापैकी ५७४ खेळाडूंची ऑक्शनसाठी निवड करण्यात आली आहे. या ५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. दरम्यान यावेळी मेगा ऑक्शनमध्ये युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळणार आहे.

वय वर्ष फक्त १८! IPL लिलावात या युवा खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
IPL 2025 Mega Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या

वैभव सूर्यवंशी

वैभव सूर्यवंशी या लिलावासाठी नाव नोंदणी करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बिहारकडून खेळणारा वैभव अवघ्या १३ वर्षांचा आहे. गेल्या महिन्यात तो भारतीय अंडर १९ संघातून ऑस्ट्रेलियाविरुद्ध युथ कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

या मालिकेतील एका सामन्यात त्याने अवघ्या ५८ चेंडूत शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ही दमदार कामगिरी पाहता फ्रेंचायझी त्याला आपल्या संघात घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतात.

वय वर्ष फक्त १८! IPL लिलावात या युवा खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! प्रमुख फलंदाजाला बसवलं

आयुष म्हात्रे

मुंबईचा वंडर बॉय आयुष्य म्हात्रेने इराणी ट्रॉफीत मुंबईसाठी पदार्पण केलं. मात्र या स्पर्धेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याचा क्लास पाहायला मिळाला. महाराष्ट्राविरुद्ध खेळताना त्याने ५२ आणि १७६ धावांची खेळी केली. या १७ वर्षीय खेळाडूला चेन्नई सुपर किंग्जने ट्रायलसाठी बोलवलं होतं.

वय वर्ष फक्त १८! IPL लिलावात या युवा खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
IND vs AUS: पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार?

हार्दिक राज

हार्दिक राज या १८ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने कर्नाटकमध्ये झालेल्या महाराजा ट्रॉफीत दमदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने ७ डावात १५५ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १ अर्धशतक झळकावलं होतं.

फलंदाजीसह गोलंदाजीतही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला होता. त्याने गोलंदाजीत ७ गडी बाद केले होते. त्याची अष्टपैलू कामगिरी पाहून फ्रेंचायझी त्याला संघात घेण्यासाठी पैशांचा पाऊस पाडू शकतात.

वय वर्ष फक्त १८! IPL लिलावात या युवा खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
IPL 2025 Mega Auction: आयपीएल लिलावात या ऑलराऊंडर्सवर लागू शकते सर्वाधिक बोली

आंद्रे सिद्धार्थ

तामिळनाडूचा १८ वर्षीय फलंदाज आंद्रे सिद्धार्थने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. मधल्या फळीत फलंदाजी करताना या फलंदाजाने तामिळनाडू प्रीमियर लीग आणि बुची बाबू ट्रॉफीत दमदार फलंदाजी केली होती. त्याने या स्पर्धेत ३८, ६६,५५, ४१,९४ आणि ७८ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com