IPL 2024 RCB vs KKR : केकेआरची तुफान फटकेबाजी; आरसीबीसमोर २२३ धावांचे आव्हान

IPL 2024 RCB vs KKR : आयपीएल २०२४ चा ३६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होत आहे. या मोसमात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आलेत. केकेआर आणि आरसीबी या दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्ड बघितला तर ३४ सामन्यांमध्ये केकेआरचा वरचष्मा आहे. केकेआरने २० वेळा सामने जिंकलेत. तर आरसीबी फक्त १४ वेळा जिंकला आहे.
 IPL 2024  RCB vs KKR : केकेआरची तुफान फटकेबाजी; आरसीबीसमोर २२३ धावांचे आव्हान

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru :

आयपीएल २०२४ चा ३६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू च्यात खेळला जातोय. कोलकाताचे होम ग्राऊंड ईडन गार्डन्सवर हा सामना सुरू आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्याचा फायदा घेत केकेआरने तुफान फटकेबाजी करत २२२ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी आरसीबीला २२३ धावा करण्याची गरज आहे.

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिलिप सॉल्टची झंझावाती खेळी, त्यानंतर श्रेयस अय्यर केलेलं अर्धशतक आणि शेवटच्या षटकांमध्ये रमणदीपच्या वेगवान खेळीमुळे केकेआरने २० षटकांत २२२ धावा केल्या. आरसीबीकडून गोलंदाजी करताना यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांनी २-२ विकेट घेतल्या. दोघांनी आपापल्या ४ षटकात स्पेलमध्ये अनुक्रमे ५६ आणि ३५ धावा दिल्या.

मोहम्मद सिराजने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ४० धावा देत १ विकेट घेतली. लोकी फर्ग्युसनलाही एक विकेट मिळाली. त्याने ४ षटकात ४७ धावा दिल्या. कर्ण शर्मा हा एकमेव गोलंदाज ठरला ज्याला एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याने ४ षटकात ३३ धावा दिल्या. दरम्यान दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्ड बघितला तर ३४ सामन्यांमध्ये केकेआरचा वरचष्मा आहे. केकेआरने २० वेळा सामने जिंकलेत. तर आरसीबी फक्त १४ वेळा जिंकलाय.

या हंगामात बेंगळुरू संघाची स्थिती वाईट आहे. आरसीबीने पंजाब किंग्जसोबत झालेल्या ७ सामन्यांपैकी फक्त १ सामना जिंकू शकलाय. उर्वरित ६ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या ६पैकी ४ सामने जिंकले आहेत.

बेंगळुरू की प्लेइंग-११

फाफ डु प्लेसी ( कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमरन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद सिराज.

कोलकाता की प्लेइंग-११

फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

 IPL 2024  RCB vs KKR : केकेआरची तुफान फटकेबाजी; आरसीबीसमोर २२३ धावांचे आव्हान
PBKS vs GT,IPL 2024: पराभवाची परतफेड करण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात! पंजाबविरुद्ध असा राहिलाय हेड टू हेड रेकॉर्ड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com