IPL 2024 Auctions: केव्हा,कुठे अन् कधी पाहता येणार IPL 2024 स्पर्धेचं ऑक्शन! इथे पाहू शकता फुकटात

IPL 2024 Auction Live Streaming Updates: हा लिलाव फ्रीमध्ये कुठे पाहता येईल आणि किती वाजता सुरु होईल? जाणून घ्या.
ipl auction
ipl auctionsaam tv news
Published On

IPL 2024 Auction Live Streaming And Timings Updates:

आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे.या स्पर्धेचा लिलाव येत्या १९ डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलाव सोहळा देशाबाहेर आयोजित केला जाणार आहे. या लिलावात ३३३ खेळाडू सहभाग घेणार आहेत.

ज्यात २१४ भारतीय आणि ११९ परदेशी खेळाडूंचा सहभाग असणार आहे. दरम्यान हा लिलाव फ्रीमध्ये कुठे पाहता येईल आणि किती वाजता सुरु होईल? जाणून घ्या.

किती वाजता सुरु होईल लिलाव?

आयपीएल २०२४ स्पर्धेचा लिलाव १९ डिसेंबर २०२३ रोजी दुबईत पार पडणार आहे. हा लिलाव स्थानिक वेळेनूसार सकाळी ११:३० वाजता सुरु होईल. तर भारतीय वेळेनूसार दुपारी १ वाजता सुरु होईल.

कुठे पाहता येईल लाईव्ह?

आयपीएल २०२४ स्पर्धेचा लिलाव स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर जियो सिनेमावर तुम्ही हा लिलाव फ्रीमध्ये पाहू शकता. हा लिलाव तुम्ही www.jiocinema.com वर लाईव्ह पाहु शकता.

कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?

गुजरात टायटन्स (३८.१५ कोटी रुपये)

सनरायजर्स हैदराबाद (३४ कोटी रुपये)

कोलकाता नाइट राइडर्स (३२.७ कोटी रुपये)

चेन्नई सुपर किंग्ज (३१.४ कोटी रुपये)

पंजाब किंग्ज (२९.१ कोटी रुपये)

दिल्ली कॅपिटल्स (२८.९५ कोटी रुपये)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (२३.२५ कोटी रुपये)

मुंबई इंडियन्स (१७.१५ कोटी रुपये)

राजस्थान रॉयल्स (१४.५ कोटी रुपये)

लखनऊ सुपर जाएंट्स (१३.१५ कोटी रुपये)

ipl auction
IPL 2024 Auctions: IPL लिलावात या २ खेळाडूंवर लागणार सर्वात मोठी बोली! दिग्गज भारतीय खेळाडूची मोठी भविष्यवाणी

सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

चेन्नई सुपर किंग्स: अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चाहर, डेवोन कॉनव्हे, महेश थिक्षणा, मथीशा पथिराना, मिचेल सँटनर, मोइन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, ऋतुराज गायकवाड़, शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे,राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा

दिल्ली कॅपिटल्स: अभिषेक पोरेल, एनरिक नॉर्खिया, अक्षर पटेल, डेव्हिड वार्नर, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, खलील अहमद, विक्की ओस्तवाल, यश ढुल,ईशांत शर्मा, कुलदीप यादव, ललित यादव, लुंगी एन्गिडी

गुजरात टायटन्स: अभिनव सदारंगानी, साई सुदर्शन, दर्शन नलकंडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटिल, केन विलियमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, आर साई किशोर, राहुल तेवतिया, राशिद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा.

कोलकाता नाइट रायडर्स: आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नितीश राणा, रहमानुल्लाह गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नारायण, सुयश शर्मा, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर.

लखनऊ सुपर जांयट्स: अमित मिश्रा, आयुष बदोनी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, के गौतम, क्रुणाल पांड्या, काइल मेयर्स, मोहसिन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन, प्रेरक मांकड़, क्विंटन डी कॉक, रवि बिश्नोई, यश ठाकुर, युद्धवीर चरक. , मार्कस स्टोइनिस, मार्क वुड, मयंक यादव, केएल राहुल,

मुंबई इंडियन्स: आकाश मधवाल, अर्जुन तेंदुलकर, डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, जेसन बेहरेनडोर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंह, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, पियूष चावला, रोहित शर्मा, रोमारियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, विष्णु विनोद, हार्दिक पांड्या. (Latest sports updates)

ipl auction
IND vs SA,2nd ODI: भारत-द.आफ्रिका दुसऱ्या वनडेची वेळ बदलणार! वाचा कुठे,कधी अन् किती वाजता रंगणार सामना?

पंजाब किंग्स: अर्शदीप सिंह, अथर्व तायदे, हरप्रीत बराड़, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, जॉनी बेयरस्टो, कैगिसो रबाडा, लियाम लिविंगस्टोन, नाथन एलिस, प्रभसिमरन सिंह, राहुल चाहर, ऋषि धवन, सैम करन, शिखर धवन, शिवम सिंह, सिकंदर रजा, विदवथ कवरप्पा.

राजस्थान रॉयल्स: अॅडम जाम्पा, आवेश खान,ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठौड़, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, सिमरन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जायसवाल, युजवेंद्र चहल.

रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु: आकाशदीप, अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशु शर्मा, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर, मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टॉप्ले, सुयश प्रभुदेसाई, विराट कोहली, विशक विजय कुमार, विल जॅक्स, कॅमरून ग्रीन.

सनरायजर्स हैदराबाद: अब्दुल समद, अभिषेक शर्मा, ऐडन मारक्रम, अनमोलप्रीत सिंह, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जानसन, मयंक अग्रवाल, मयंक मारकंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, टी नटराजन, उमरान मलिक, उपेन्द्र सिंह यादव, वॉशिंगटन सुंदर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com