30 नोव्हेंबर रोजी IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी, कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2021 मध्ये संघाचे नेतृत्व करणारा कर्णधार इऑन मॉर्गनला (Eoin Morgan) कोलकाता नाईट रायडर्स कायम ठेवण्याच्या मनस्थितीत नाही. KKR व्यवस्थापनातील सूत्रांच्या माहितीनुसार, मॉर्गनला या निर्णयाची आधीच माहिती देण्यात आली आहे.
मॉर्गनच्या खराब फॉर्ममुळे केकेआर व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. केकेआरच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, “आयपीएल 2021 मध्ये मॉर्गनचा फलंदाजीचा फॉर्म चिंतेचा विषय होता. संघाचे नेतृत्व त्याने चांगल्या पद्धतीने पार पाडसे असले तरी त्याला फलंदाजीत विशेष चमक दाखवता आली नाहीये. त्यामुळे संघ व्यवस्थापक त्याला कायम ठेवण्याच्या मनस्थीतीमध्ये नाहित." इंग्लंडचा दिग्गज कर्णधार इऑन मॉर्गनने गेल्या मोसमात 17 सामन्यांत 11 च्या सरासरीने केवळ 117 धावा केल्या होत्या. सुत्रांनी सांगितले की फ्रँचायझी इंग्लंडच्या कर्णधारावर मोठी रक्कम खर्च करण्यास तयार नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याचा फॉर्म कायम राहिला आहे.
मॉर्गनला कायम ठेवलं नाही तर पुढच्या मोसमासाठी केकेआर नवीन कर्णधाराच्या शोधात असेल. दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार केकेआर वरुण चक्रवर्तीसह व्यंकटेश अय्यरला संघात कायम ठेवू शकते. दोन भारतीयांसह, केकेआर पॅट कमिन्सला देखील कायम ठेवू शकतो, परंतु केकेआर सोबत तो पूर्ण हंगाम खेळला तरच त्याला संधी दिली जाऊ शकते. कमिन्सने कोणतीही हमी न दिल्यास, केकेआर आंद्रे रसेल किंवा सुनील नारायन यापैकी एकाला कायम ठेवू शकते.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.