दिनेश कार्तिकला क्वालिफायर २ सामन्याआधीच दणका, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा यष्टीरक्षक आणि स्फोटक फलंदाज दिनेश कार्तिक याला आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून फटकारण्यात आले आहे.
Dinesh Karthik
Dinesh Karthik Saam Tv

नवी दिल्ली: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा यष्टीरक्षक आणि स्फोटक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून फटकारण्यात आले आहे. एलिमिनेटरचा सामना बुधवारी झाला. या सामन्यावेळी दिनेश कार्तिककडून मोठी चूक झाली, असं आयपीएलने (IPL) जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कोलकाताच्या ( ) ईडन गार्डन मैदानात लखनऊ सुपरजायंट्सला हरवून आरसीबीने (RCB) क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. आज शुक्रवारी त्यांचा सामना ( IPL Match ) राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. (IPl Cricket News In Marathi )

हे देखील पाहा -

यासंदर्भात आयपीएलकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मात्र, दिनेश कार्तिकने नियमांचे उल्लंघन होण्यासारखी अशी कोणती कृती केली? याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला नाही. कलम २.३ अन्वये कार्तिक लेव्हल १ अंतर्गत दोषी आढळला आहे. याबाबत त्यानेही कबुली दिली आहे. अशा चुकीसाठी मॅच रेफरींचा निर्णय अखेरचा आणि सगळ्यांना मान्य असतो, असे आयपीएलकडून सांगण्यात आले आहे.

अखेरच्या षटकात आरसीबीचा विजय

गुणतालिकेत अव्वल ४ संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरतात. त्यात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटरची लढत होते. त्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जातो. या सामन्यात लखनऊला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे लखनऊला स्पर्धेबाहेर जावे लागले. या सामन्यात कार्तिकने २३ चेंडूंमध्ये ३७ धावांची खेळी केली. नाबाद ११२ धावा करणारा रजत पाटीदार याच्या साथीने त्याने आरसीबी संघाला २० षटकांत ४ बाद २०७ धावांची मजल मारून दिली.

Dinesh Karthik
संभाजीराजे छत्रपतींनी मनाचा मोठेपणा दाखवला तो स्वागतार्ह : सुप्रिया सुळे

दिनेशच्या बॅटमधून खोऱ्यानं धावा

यंदाच्या मोसमात दिनेश कार्तिक फार्मात आहे. त्याच्या बॅटमधून सातत्याने धावांचा पाऊस पडत आहे. १५ सामन्यांत दिनेश कार्तिकने ३२४ धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर तीन वर्षांनंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये ६४.८० ची सरासरी १८७.२८ च्या स्ट्राइक रेटने धावा कुटल्या आहेत. त्यात दिल्लीविरोधात ६६ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com