आयपीएल 2022 (IPL 2022) सुरु होण्यापुर्वी राजस्थान रॉयल्सने त्यांच्यासोबत एक अनुभवी खेळाडू जोडला आहे. ज्याला टी-20 फॉरमॅटमधील महान गोलंदाजांपैकी एक मानले जाते. तो खेळाडू म्हणजे लसिथ मलिंगा. ज्याला राजस्थान रॉयल्सने (Rajstan Royal) त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये स्थान दिले आहे. लसिथ मलिंगाची (Lasith Malinga) राजस्थान रॉयल्सने वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
एकेकाळी मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणारा मलिंगा आता राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना युक्त्या शिकवणार आहे. मुंबई इंडियन्सही (Mumbai Indians) मलिंगाचे निशाण्यावर असणार आहे. मलिंगाने गेल्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि कोरोनामुळे तो 2020 मध्येही आयपीएल खेळला नव्हता. आता मलिंगाने या लीगमध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पुनरागमन केले आहे.
लसिथ मलिंगा हा आयपीएलमधील महान गोलंदाजांपैकी एक आहे. 2008 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झालेल्या मलिंगाने या संघाला 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. मलिंगाच्या नावावर आयपीएलमध्ये 122 सामन्यांत 170 बळी आहेत. 2018 मध्ये मलिंगाला मुंबई इंडियन्सने विकत घेतले नाही पण त्याला गोलंदाजी मेंटॉर नक्कीच बनवले होते. 2019 मध्ये मलिंगाने मुंबई संघात खेळाडू म्हणून पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत अप्रतिम कामगिरी करत संघाला चॅम्पियन बनवले.
यावेळी राजस्थान रॉयल्सचा संघ अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांनी सज्ज आहे. ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर-नाईल, ओबेद मॅककॉय, प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या गोलंदाजांचा समावेश आहे. मलिंगाच्या सल्ल्याने हे खेळाडू अधिक चांगली कामगिरी करू शकतील.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.