IPL 2022 च्या लिलावापूर्वी, अहमदाबाद IPL फ्रँचायझीचे आपले तीन खेळाडू निवडले आहेत. हार्दिक पंड्या (Hardik Pandya), रशीद खान आणि शुभमन गिल यांची नावं समोर आली आहेत.. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या आणि रशीद या दोघांना प्रत्येकी 15 कोटी रुपये देण्याचे ठरवले आहे, तर हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच शुभमन गिलला 7 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सने सोडलेला हार्दिक पांड्या आयपीएल (IPL 2022) मध्ये एखाद्या संघाचा कर्णधार बनण्याची ही पहिलीच वेळ असेल.
2015 मध्ये, त्याला MI ने 10 लाख रुपयांना घेतले आणि तेव्हापासून तो संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला. आपल्या सतत प्रगतीसह, त्याने 92 सामन्यांमध्ये 1,476 धावा केल्या आणि 42 बळी घेत भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वत: ला सिद्ध केले. 2018 च्या लिलावापूर्वी MI ने त्याला 11 कोटी रुपयांना रिटेन केले होते. (IPL 2022 Auction Latest news updates)
अहमदाबाद आणि लखनौ या दोन्ही फ्रँचायझी राशिद खानला त्यांच्या संघात घेण्याच्या बाजूने होत्या. परंतु तो 6 कोटींच्या वाढीसह अहमदाबादच्या संघाची जर्सी परिधान करेल. कारण याआधी तो हैदराबादच्या (SRH) संघात होता आणि तिथे त्याला प्रत्येक मोसमात 9 कोटी रुपये दिले जाणर होते. मात्र, हैदराबादच्या फ्रँचायझीने त्याला पगारवाढ दिली नव्हती म्हणून त्याने संघातून माघार घेतली होती. T20 चा सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज राशिदने IPL च्या 76 सामन्यात 92 विकेट घेतल्या आहेत.
शुभमन गिलला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सोबतच खेळणार अशा चर्चा होत्या, परंतु त्याला मोठी रक्कम देवून अहमदाबादच्या संघाने आपल्या संघात घेतले आहे. शुभमन गिलने 58 सामन्यात 31.48 च्या सरासरीने 1,417 धावा केल्या आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने शुभमन गिलला ७ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. या तीन खेळाडूंव्यतिरिक्त आशिष नेहरा अहमदाबाद संघाचा मुख्य प्रशिक्षक असतील, गॅरी कर्स्टन हे देखील प्रशिक्षकांच्या यादीत असतील. विक्रम सोलंकी हे अहमदाबाद संघाचे संचालक असतील.
यासह, अहमदाबाद फ्रँचायझीने ओपनिंग, अष्टपैलू पर्याय आणि फिरकीपटू अशा तीन महत्त्वाच्या जागा निश्चित केल्या आहेत. मात्र, तीन घोषणांमुळे अहमदाबाद संघाचे 33 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आयपीएल 2022 च्या लिलावात 15 खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी फक्त 53 कोटी रुपये शिल्लक आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.