IPL 2022: श्रेयश अय्यरला संघात घेण्यासाठी तीन फ्रेंचायझींमध्ये चढाओढ

दिल्लीच्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवणाऱ्या श्रेयश अय्यरला (Shreyash Iyer) दिल्लीच्या संघाने रिटेन केलेले नाहिये.
Shreyash Iyer
Shreyash IyerTwitter/ @DC

इंडियन प्रीमियर लिगच्या (IPL 2022) अगोदर चाहते ऑक्शनची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचबरोबर जे मोठे खेळाडू असतात ते कोणत्या संघाकडून खेळणार याचीही उत्सूकता चाहत्यांना असते. दिल्लीच्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवणाऱ्या श्रेयश अय्यरला (Shreyash Iyer) दिल्लीच्या संघाने रिटेन केलेले नाहिये. आता अय्यर एका नव्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. आनंदाची बाब म्हणजे अय्यर ला आपल्या संघात घेण्यासाठी तीन फ्रेंचायझी प्रयत्नात आहेत. फक्त संघात घेण्यासाठीच नाहीतर त्याला आपल्या संघाचा कर्णधार बनवण्याच्याही तयारीत फ्रेंचायझी आहेत. यामध्ये आरसीबीच्या संघाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे लिलावात श्रेयस अय्यरवर मोठी बोली लावू शकतात. कारण या सर्व फ्रेंचायझींना एक चांगल्या कर्णधाराची गरज आहे.

Shreyash Iyer
जेष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती गंभीर; चार दिवसांपासून शुद्ध हरपली

श्रेयश अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीच्या संघाने 2020 मध्ये अंतीम सामन्यात प्रवेश केला होता. त्यामध्ये मुंबई इंडियन्स दिल्लीला पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्यावर श्रेयशला संघातून बाहेर पडावे लागले होते आणि संघाचे नेतृत्व युवा कर्णधार म्हणून रिषभ पंतकडे (Rishabh Pant) आले होते. मागच्या हंगामाच्या शेवटाला श्रेयश संघात आला होता परंतु तेव्हाही रिषभ पंतने कर्णधार पद भुषवले होते.

दिल्ली संघाने कायम ठेवलेल्या 4 खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यरचा समावेश केला नाही. नवीन संघ लखनऊ आणि अहमदाबाद श्रेयस अय्यरची निवड करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरचा लखनऊ किंवा अहमदाबाद संघातील निवडक खेळाडूंच्या यादीत समावेश नाही. याचा अर्थ अय्यरला लिलावात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com