R Praggnanandhaa: आर प्रज्ञानंदने रचला इतिहास; ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंदला टाकले मागे

R Praggnanandhaa Chess: भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर्स इव्हेटंमध्ये डिंग लिरेनला पराभूत केलं आहे
R Praggnanandhaa
R Praggnanandhaasaam tv news
Published On

R Praggnanandhaa News In Marathi:

भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर्स इव्हेटंमध्ये डिंग लिरेनला पराभूत केलं आहे. आर प्रज्ञानंदने वर्ल्डचॅम्पियन डिंग लिरेनला चौथ्या फेरीत बाहेर करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. या विजयासह त्याने दिग्गद बुद्धिपळपटू विश्वानाथन आनंदला मागे सोडत भारताचा नंबर १ ग्रँडमास्टर बनला आहे. आर प्रज्ञानंदने सलग दुसऱ्यांदा डिंगला या स्पर्धेत धूळ चारली आहे.

या दमदार खेळानंतर आर प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला रेटिंगच्या बाबतीतही मागे सोडलं. तो FIDE च्या रेटिंगमध्ये ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे २७४८.३ रेटिंग पॉईंट्स आहेत. तर २७४८.० रेटिंग पॉईंट्ससह विश्वनाथन १२ व्या स्थानी आहे. मॅग्नस कार्लसन या यादीत अव्वल स्थानी आहे.

कमी वयात आर प्रज्ञानंदने आपल्या नावावर अनेक मोठ मोठे रेकॉर्ड केले आहेत. २०१६ मध्ये तो सर्वात कमी वयाचा इंटरनॅशनल मास्टर ठरला होता. ज्यावेळी त्याने हा किताब पटकावला होता, त्यावेळी त्याचं वय १० वर्ष आणि १० महिने इतकं होतं. त्यानंतर २०१७ मध्ये तो पहिल्यांदा ग्रँड मास्टर बनला होता. (Latest sports updates)

R Praggnanandhaa
IND vs AFG 3rd T20I: अफगाणिस्तानचा सुपडा साफ करण्यासाठी टीम इंडिया सज्ज! बंगळुरुत असा राहिलाय रेकॉर्ड

आर प्रज्ञानंदबद्दल सांगायचं झालं तर त्याने अमेरिकेचा ग्रँडमास्टर फॅबियानो कारूआनाला पराभूत केलं होतं. त्याने ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या चेम मास्टर टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. यासह तो या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करणारा दुसराच भारतीय ठरला होता.

R Praggnanandhaa
Rohit Sharma Record: एकच नंबर! हिटमॅनने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com