
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा ही वरुण चक्रवर्तीसाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हती. बुमराह बाहेर झाल्यामुळे संघात स्थान मिळणं, त्यानंतर संघात स्थान मिळणं. मग मिळालेल्या संधीचं सोनं करुन त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. येत्या काही दिवसात तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसेल.
वरुणला २०२१ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र या स्पर्धेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या सुमार कामगिरीमुळे त्याला धमकीचे फोन आल्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतून बाहेर पडावं लागलं होतं. या स्पर्धेत वरुण चक्रवर्ती हा भारतीय संघाच्या अपयशाचं कारण ठरला होता. या स्पर्धेत तो विकेट्स घेण्यात अपयशी ठरला होता, यासह महागडाही ठरला होता. त्यामुळे त्याला भारतीय संघातून बाहेर केलं गेलं होतं.
तब्बल ३ वर्ष त्याला भारतीय संघातून बाहेर राहावं लागलं. त्यानंतर आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करुन त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीत ३ सामन्यांमध्ये त्याने ९ गडी बाद केले.
वरुण चक्रवर्तीने एका युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, ' तो माझ्या आयुष्यातील खूप कठीण काळ होता. मी डिप्रेशनमध्ये होतो. माझी वर्ल्डकपसाठी संघात निवड झाली, पण मी त्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकलो नव्हतो.
मला एकही विकेट न घेतल्याचा पश्चाताप होत होता. त्यानंतर ३ वर्ष माझी भारतीय संघात निवड झाली नव्हती. त्यामुळे मला तरी वाटतं की पदार्पणापेक्षा माझी कमबॅक करण्याची वाट जास्त खडतर होती.'
धमकीचे फोन
तसेच तो पुढे म्हणाला की, '२०२१ वर्ल्डकपनंतर मला धमकीचे फोनही आले होते. भारतात येऊ नकोस, अशी धमकी देण्यात आली. ती लोकं माझा पाठलाग करत होते. त्यामुळे मला लपून राहावं लागलं. ज्यावेळी मी विमानतळावरुन येत होतो, त्यावेळी काही लोकं बाईकवरुन माझा पाठलाग करत होते. त्यावेळी झालेली टीका आणि आता मिळणारं प्रेम पाहून खरंच खूप आनंद होतोय.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.