BCCI: अखेर BCCI ने केली नव्या निवड समितीची घोषणा, चार नवे चेहरे पण चेतन शर्मांच्या हातीचं पुन्हा सुत्रे

तब्बल पन्नास दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या निवड समितीची घोषणा करण्यात आली आहे.
BCCI
BCCISaam TV
Published On

Chetan Sharma Chief Selector: तब्बल पन्नास दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या निवड समितीची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने शनिवारी (7, जानेवारी) पाच सदस्यांची नव्या निवड समितीची घोषणा करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये चार नवे सदस्य सामिल करण्यात आले असून चेतन शर्मा यांचा या निवड समितीत पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. तसेच या निवड समितीचे अध्यक्षपदही चेतन शर्मा यांच्याकडे देण्यात आले आहे.

BCCI
Samruddhi Mahamarg Accident : समृद्ध महामार्गावर २३ दिवसांत १०० हून जास्त अपघात; ही कारणे आली समोर

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकातील लाजिरवाण्या पराभव स्विकारावा लागला होता. या पराभवानंतर बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पन्नास दिवसांनी बीसीसीआयने नव्या निवड समितीची घोषणा केली आहे. या समितीचेही अध्यक्ष चेतन शर्मा आहेत.

बीसीसीआयने शनिवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नवीन निवड समितीच्या घोषणेची माहिती दिली. नवीन निवड समितीमध्ये फक्त चेतन शर्मा हा जुना चेहरा आहे, तर इतर चार नावे प्रथमच वरिष्ठ निवड समितीचा भाग असतील. यामध्ये माजी कसोटीपटू सलील अंकोला, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन सैराट यांना स्थान मिळाले आहे.

BCCI
Maharashtra News : शिंदे- फडणवीस सरकारवर माेठा दबाव टाकण्याचे शिक्षकांचे प्लॅनिंग; जाणून घ्या कारण

ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर बीसीसीआयने मागील निवड समितीचा कार्यकाळ पूर्ण न करताच नवीन नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. 18 नोव्हेंबर रोजी त्या घोषणेच्या 50 दिवसांनंतर, BCCI ने अखेर नवीन समिती नियुक्त केली. अशोक मल्होत्रा, सुलक्षणा नाईक आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने 600 हून अधिक अर्जांपैकी 11 स्पर्धकांची निवड केली होती, ज्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि शेवटी समितीने या 5 नावांची शिफारस केली, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com