Suryakumar Yadav: विराटची रिप्लेसमेंट मिळाली...दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर सूर्या काय म्हणाला?

Suryakumar Yadav On Tilak Varma: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने तिलक वर्माचं कौतुक केलं आहे.
Suryakumar Yadav: विराटची रिप्लेसमेंट मिळाली...दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर सूर्या काय म्हणाला?
suryakumar yadavtwitter
Published On

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना जोहान्सबर्गमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १३५ धावांनी शानदार विजय मिळवत ,मालिका ३-१ ने खिशात घातली. या सामन्यात तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने वादळी शतकी खेळी केली. हे तिलक वर्माचं सलग दुसरं शतक ठरलं आहे. या खेळीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने तिलक वर्माचं भरभरुन कौतुक केलं आहे.

भारताचा माजी फलंदाज विराट कोहली आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. माज्ञ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाची जागा रिकामी होती.

रिषभ पंतला या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली गेली, मात्र त्याला फार काही यश मिळालं नाही. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव स्वत: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र त्याला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला.

Suryakumar Yadav: विराटची रिप्लेसमेंट मिळाली...दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर सूर्या काय म्हणाला?
IND vs SA: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यात पडला रेकॉर्ड्सचा पाऊस; संजू- तिलकने मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सार्थ ठरला. त्याने तिसऱ्या सामन्यात शतक झळकावलं. त्यानंतर चौथ्या सामन्यातही त्याने रेकॉर्डब्रेक शतक झळकावलं.

Suryakumar Yadav: विराटची रिप्लेसमेंट मिळाली...दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर सूर्या काय म्हणाला?
IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, 'तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं ही युवा फलंदाजासाठी चांगली संधी होती. आम्ही दोघांनी या विषयावर चर्चा केली आणि त्याने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली.

त्याला सांगताच, या रोलसाठी तो तयार झाला. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते खरंच अद्भुत होतं. मी आशा करतो की तो केवळ टी-२० फॉरमॅटमध्ये नव्हे, तर सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com