Ind vs SL T20 Siries: क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे असं नेहमीच म्हणलं जाते. कधी कोणता सामना फिरेल, आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेईल, हे काही सांगता येत नाही, त्यामुळेच क्रिकेटमध्ये एका सामन्यात विलेन ठरलेला खेळाडू काही तासात हिरो ठरु शकतो. असाच काहीसा प्रकार भारत आणि श्रीलंका यांच्या टी ट्वेंटी मालिकेतही घडला आहे.
दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाचे खापर फोडण्यात आल्याने जो खेळाडू विलन ठरला होता, तोच खेळाडू शेवटच्या सामन्यात मात्र हिरो ठरला. कोण आहे तो खेळाडू, आणि काय आहे त्याची शेवटच्या सामन्यातील कामगिरी, चला जाणून घेवू.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारत आणि श्रीलंका (Srilanka) टी ट्वेंटी सामन्यातील शेवटचा सामना भारतीय संघाने जिंकला. या विजयासोबतच टीम इंडियाने ही मालिकाही खिशात घातली. या सामन्यात भारतीय गोलंदाज अर्शदिप सिंगने तीन विकेट घेत चमकदार कामगिरी केली. हाच अर्शदिप दुसऱ्या सामन्यात मात्र विलेन ठरला होता. या सामन्यातील त्याच्या गोलंदाजीवर चौफेर टीका झाली होती. मात्र या टीकेला अर्शदिपने तिसऱ्या सामन्यातील कामगिरीने चोख उत्तर दिले आहे.
शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात अर्शदीपने बॉलिंगची धार दाखवत श्रीलंकेच्या 3 फलंदाजांचा काटा काढला. अर्शदीपने एकूण 3 विकेट्स घेतल्या. अर्शदीप टीम इंडियाकडून तिसऱ्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
दरम्यान, अर्शदिपसिंग शेवटच्या सामन्यात गोलंदाजीचा हिरो ठरला तर फलंदाजीमध्ये सुर्यकुमार यादवची बॅट तळपली. सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) वादळी शतकाने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्यामुळेच भारतीय संघाने २२९ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्यापासून भारतीय संघाने या सामन्यावर मजबूत पकड ठेवली अन ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.