Ind Vs SL 2nd ODI: भारत आणि श्रीलंका (Srilanka) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कोलकात्ताच्या ईडन गार्डनवर मैदानावर रंगणार आहे. या सामन्याच्या सुरूवातीला श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने अंतिम ११ खेळाडूंमध्ये मोठा बदल केला आहे. ज्यामध्ये गोलंदाज यजुवेंद्र चहलच्या जागी कुलदिप यादवला संधी दिली आहे. त्याचबरोबर इशान किशन आणि सुर्यकुमार यादवलाही वगळण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारत आणि श्रीलंका यांच्यामधील दुसरा एकदिवसीय सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर सुरू आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे.
काय आहे ईडन गार्डनवर भारतीय संघाचे रेकॉर्ड:
पाच वर्षांपूर्वी ईडन गार्डन्सवर शेवटचा एकदिवसीय सामना झाला होता ज्यात भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 252 धावांवर ऑलआऊट झाला आणि प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 202 धावाच करू शकला. म्हणजे गुवाहाटीसारख्या या खेळपट्टीवर धावा काढणे खूप कठीण आहे.
हवामानाबद्दल बोलायचे झाले तर कोलकात्यात पावसाची शक्यता नाही. मात्र रात्री दव पडू शकते त्यामुळे गोलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रात्री तापमानात घट होईल, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकेल. गेल्या 6 वनडेमध्ये या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच विजय मिळवला आहे.
भारतीय संघः रोहित शर्मा (Rohit Sharma) (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, के एल राहुल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, कुलदिप यादव
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.